प्रेयसीला जिवंत जाळले

By Admin | Updated: June 29, 2017 02:41 IST2017-06-29T02:41:23+5:302017-06-29T02:41:23+5:30

लिव्ह इन रिलेशनशीपमधील प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात महिला गंभीर जखमी झाली असून प्रियकर फरार झाला आहे.

Burned lover to lover | प्रेयसीला जिवंत जाळले

प्रेयसीला जिवंत जाळले

लोकमत ऩ्यूज नेटवर्क
वसई : लिव्ह इन रिलेशनशीपमधील प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात महिला गंभीर जखमी झाली असून प्रियकर फरार झाला आहे.
ही घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकणपाडा येथे घडली. याठिकाणी मनोज चौरे आणि अनिता वानखेडे (३५) गेल्या तीन महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. त्यांच्यासोबत बाबूराव येसारकर हा अनिताचा मानलेला भाऊही राहत होता. मनोज गवंडी काम करतो तर अनिता घरकाम करते. तो चारित्र्याच्या संशयावरून तिच्याशी नेहमी भांडण करीत असे.
सोमवारी दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर संतापलेल्या मनोजने रॉकेलचा डबा अनिताच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले व मनोज आणि बाबूराव घटनास्थळावरून पळून गेले. ती ७७ टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कांदीवली येथील शताब्दी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर पोलीस फरार मनोजचा शोध घेत आहेत.

Web Title: Burned lover to lover