पारोळ येथे घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

By Admin | Updated: October 10, 2015 23:29 IST2015-10-10T23:29:59+5:302015-10-10T23:29:59+5:30

वसई पूर्व भागातील पारोळ येथे कृपेश पाटील यांच्या बंगल्यात शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास बंगल्याच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून त्यांच्या खोलीत ठेवलेली ७० हजारांची

Burglars at Parol; 70 thousand cash lapses | पारोळ येथे घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

पारोळ येथे घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

पारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ येथे कृपेश पाटील यांच्या बंगल्यात शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास बंगल्याच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून त्यांच्या खोलीत ठेवलेली ७० हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
शुक्रवारच्या रात्री कृपेश पाटील यांच्या बंगल्यातील काही जण बाहेरगावी गेल्याने त्या रात्री फक्त बंगल्यात दोनच माणसे होती. याचा फायदा चोरट्यांनी घेत खोलीतील लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या बाजूला खोलीचा दरवाजा उघडा ठेवून कृपेश यांचे आईवडील झोपले होते. पण, चोरट्यांनी तो दरवाजा साडीने बांधून घेऊन दुसऱ्या खोलीत प्रवेश करून पूर्ण खोलीतील सामान तपासून पोबारा केला. जाताना या चोरट्यांनी त्यांच्या खोलीत असलेले किमती घड्याळही बरोबर नेऊन ते बंगल्याच्या पाठीमागच्या शेतात फेकून दिले. या घटनेची नोंद मांडवी पोलिसात केली असता या बंगल्यात चोरी करणारे तीन चोर असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला तसेच चोरी करणाऱ्या व्यक्तींनी ती पाळत ठेवून केली असावी, असे पोलिसांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Burglars at Parol; 70 thousand cash lapses