शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

बुजडपाडा जि.प. शाळा पहिली आयएसओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:43 PM

बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : २६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी डहाणू तालुक्यातील जि.प. कोटबी बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षण विभागाचे पदाधिकारी आणि विविध संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने शाळेला हा गौरव प्राप्त झाला. ही कृतज्ञता शाळा प्रशासनाने आजही जपली आहे.कोटबी या आदिवासी गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बुजडपाडा शाळा असून तिची स्थापना ४ मार्च १९५७ साली झाली. प्रारंभी इयत्ता ४, त्यानंतर ७ वी आणि आठवी इयत्ता निर्माण करून टप्प्या-टप्प्याने शाळेचे विस्तारीकरण शिक्षकांच्या प्रयत्नाने झाले. मात्र गावात कायमस्वरूपी रोजगार संधीच्या अभावी पावसाळा संपताच स्थानिकांचे स्थलांतर सुरू व्हायचे आणि त्याच्यापाठोपाठ त्यांची मुलेही जाऊ लागल्याने या शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले. यावर तोडगा म्हणून शाळेने वसतीगृह सुरू केले. एवढ्यावरच न थांबता मुंबईस्थित सामाजिक संस्थांच्या मदतीने महिलांकरिता लघुद्योग सुरू केल्याने गळती थांबली.दरम्यान, शाळा आयएसओ करावी अशी संकल्पना तत्कालीन केंद्रप्रमुख जयश्री राऊत यांनी मांडली. मुख्याध्यापक सुनील देशमुख आणि शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हा प्रवास सुरू झाला.>शालेय उपक्र मवसतिगृह, लघुउद्योग आदी उपक्रमांच्या माध्यमातून पालकांच्या हाताला काम देऊन पणत्या, आकाशकंदील, राख्या इ. निर्मिती, परसबाग, शाळेतील मदतनीस स्वयंपाकगृहात अ‍ॅपरण आणि ड्रेसकोड घालून काम, शाळेशी संबंधित सर्वांना ओळखपत्र, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सुविधा.>आयएसओ शाळा निकष पूर्ण करण्याचा निश्चय केल्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या बाबीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. राज्य आणि जिल्हास्तरावरून अधिकारी तसेच शिक्षणप्रेमी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त करतात. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीचे वर्ग घेण्याचा मानस आहे.- सुनील देशमुख मुख्याध्यापक,जि.प. शाळा कोटबी बुजडपाडा>विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली२०१४ साली एनजीओच्या माध्यमातून स्टेशनरी, दफ्तर, सायकली यांचा लाभ मिळू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली.