गोळीबारातून बिल्डर बचावले
By Admin | Updated: October 28, 2016 02:24 IST2016-10-28T02:24:52+5:302016-10-28T02:24:52+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुडे गावाच्या हद्दीत मुंबई बाजू कडे जाणाऱ्या एका बिल्डर्स च्या कार वर अनोळखी मोटरसायकल स्वरांनी गोळ्या झाडल्या मात्र कराच्या

गोळीबारातून बिल्डर बचावले
मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुडे गावाच्या हद्दीत मुंबई बाजू कडे जाणाऱ्या एका बिल्डर्स च्या कार वर अनोळखी मोटरसायकल स्वरांनी गोळ्या झाडल्या मात्र कराच्या उजव्या बाजूच्या पत्र्यावर गोळी लागली बिल्डर्स बचावला या घटने बाबत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा दिवसाआधी दोन कि मी अंतरावर वरई गावाच्या हद्दीत मनोर पोलिसांनी शस्त्र सहित दरोडेखोर पकडले आहेत.
मुर्तुजा इलेक्ट्रकल्सवाला नावाचा बिल्डर्स संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पालघर वरून आपल्या राहत्या घरी विरार ला जात असताना कुडे गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन अनोळखी मोटर सायकलस्वार मागून आले कार च्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करून कारच्या उजव्या बाजूला जवळ असलेले रिवॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या त्या गोळ्या कारच्या पत्र्यावर दोन ठिकाणी लागल्या मात्र काचेवर लागल्या असत्या तर बिल्डर्स मूर्तुजा जखमी झाले असते दुर्दैवाने ते बचावले मोटर सायकलवरील दोन अनोळखी व्यक्ती पसार झाले मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अशोक होनमाने यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नाकार दिला मनोर पोलीस ठाण्याचे स. पो. नि. मनोज चाळके म्हणाले की तपास सुरू आहे.