शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

बौद्ध स्तुपाची दैनावस्था; धम्मचक्र दिन आला तरी स्तुपाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 5:47 AM

भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपाºयातील बौद्ध स्तूपाची दैनावस्था झाली आहे. सुशोभिकरणाचे काम रखडून पडले असून सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे स्तूपाची अवहेलना सुरु झाली आहे.

- शशी करपे ।वसई : भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपाºयातील बौद्ध स्तूपाची दैनावस्था झाली आहे. सुशोभिकरणाचे काम रखडून पडले असून सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे स्तूपाची अवहेलना सुरु झाली आहे.नालासोपारा पूर्वेकडे मर्देस गावात प्राचीन बौद्ध स्तूप आहे. त्याचे जतन, संरक्षण आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या नफेखोरीमुळे स्तूपाची दैनावस्था झाली आहे. ठेकेदाराने पावसाळ््यात स्तूपाची हानी होऊ नये यासाठी ताडपत्री टाकली होती. मात्र, ताडपत्री दर्जाहिन असल्याने ती ठिकठिकाणी फाटली असून पावसाळ््यात स्तूपाची संरक्षण होऊ शकलेले नाही. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने धम्म चक्र दिन जवळ आला असताना स्तूपाची अवहेलना लपून राहिलेली नाही. दसºयाला धम्म चक्र दिन साजरा करण्यात येतो. यावेळी याठिकाणी हजारो भाविक हजेरी लावतात. दिवसभर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. तर १४ आॅक्टोबरला धम्म परिषदेचे आयोजन केले जाते.बौद्ध स्तूपाची पावित्र्य जपण्यासाठी सात वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासासाठी विशेष बजेट आखण्यात आले आहे. स्तूपाचा कार्यापालट त्यातून केला जाणार आहे. महाराष्ट्राची राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. बौद्ध स्तूपाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी बुद्धांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. या पुतळ््यांचे अ़नावरही गायकवाड यांच्या हस्ते ७ डिसेंबर २०११ रोजी करण्यात आले होते.बौध्द स्तुपाचा इतिहास...पुरातनात नालासोपाºयाला शूर्पारक नगरी म्हणून ओळखले जायचे. २६०० वर्षापूवी या नगरीत पूर्णा नावाचा व्यापारी उत्तरप्रदेशातील श्रीवस्ती येथे व्यापारासाठी गेला होता. तेथे भगवान बुद्धांची प्रवचने ऐकून तो प्रभावित झाला. तो बुद्धांकडे प्रवजीत (दिक्षित) झाला. धम्म स्विकारल्यानंतर पूर्णा बौद्ध भिक्खू झाला. पुढे प्रचारक बनल्यानंतर तो शूर्पारक नगरीत आला. याठिकाणी त्याने भावाच्या मदतीने चंदनाचा विशाल बुद्ध विहार बांधला. त्या विहाराला आठ दरवाजे होते. बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी गौतम बुध्द आपल्या पाचशे भिक्खूसह आले होते. बुध्दांनी त्याकाळी शूर्पारक नगरीत सात दिवस मुक्काम केला होता.बुध्दांच्या महापरिनिर्वाणानंतर दोशने वर्षांनी सम्राट अशोक यांनी याच ठिकाणी बौद्ध स्तूपाची निर्मिती केली. आपला मुलगा व मुलगी संघमित्रा यांना भिक्खू बनवून धर्म प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवून दिले. संघमित्रा आपल्या सहा भिक्खूणीसोबत बौधी वृक्षाची फांदी घेऊन समुद्रमार्गे नालासोपाºयाहून श्रीलंकेला गेली. बौद्ध स्तूप बनवताना सम्राट अशोकाने १४ शिलालेख कोरले होते. पं. भगवानलाल इंद्रजीत यांनी १८८२ साली भातेला तलावाजवळ संशोधन ८ वा शिलालेख शोधून काढला. तसेच गौतम बुद्धांच्या भिक्षा पात्राचे अवशेष शोधून काढले. ९ वा शिलालेख मुंबई एशायाटिक सोसायटीचे ग्रंथपाल ए़न. ए. मोरे यांनी १९५६ रोजी भुईगाव येथून शोधून काढला. त्याचबरोबर ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर स्ययूलॉग यांच्या मदतीने स्तूपाचे उत्खनन केले. त्यावेळी स्थानिक लोक याला बुरुड राजाचा किल्ला मानत होते.या बौद्ध स्तूपाच्या पवित्र वास्तूत आतापर्यंत हजारो लोकांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली आहे. भगवान बुध्दांनी आपल्या भेटीत याठिकाणी पाचशे महिलांना बौद्ध धर्माची दिक्षा दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ मे १९५५ रोजी याठिकाणी येऊन बुद्ध जयंती साजरी केली होती.करमाळे परिसरात दीड वर्षापूर्वीच आरक्षणबौद्ध स्तूपाचे जतन, संरक्षण आणि सुशोभिकरणाच्या कामात वसई विरार महापालिकेनेही आपले योगदान दिले आहे. त्यासाठी करमाळे परिसरात जागा आरक्षित करण्याचा ठराव महापालिकेने दीड वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्याठिकाणी वास्तू संग्रहालय, पर्यटन सेंटर, भाविकांसाठी इमारत,वाचनालय, स्तूपाची माहिती देणारा लाईट अँड साउंड शो याचा समावेश आहे. मात्र, भू संपादनात अनेक अडथळे येत असल्याने कामाला ब्रेक लागला आहे.