शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:33 IST

आरोपी प्रियकर तरुणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळच बसून होता.

मंगेश कराळे -

Nalasopara Crime : नालासोपाऱ्याच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर आरोपीने मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास दिवसाढवळ्या लोखंडी पान्याने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. हत्या करून आरोपी मृतदेहा जवळ बसलेला असताना वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तरुणीचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनसाठी पोलिसांनी पाठवला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरती रामदुलार यादव (२२) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर रोहित रामनिवास यादव (२९) असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाजवळ बसून होता. वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सहा वर्षांपासून आरोपी तरुणीवर प्रेम करत होता. मागील एक महिन्यापासून तिच्या वागण्यात संशय येत असल्याने त्याने रागाच्या भरात हे निर्घृण कृत्य केल्याचे पोलिसांनी लोकमतला सांगितले.

सोशल मीडियावर या भयानक घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणाच्या हातात भलामोठा पाना दिसत असून शेजारी तरुणी पडलेली दिसत आहे. तिच्यावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी रोहित "क्यूं किया, क्यूं किया ऐसा मेरे साथ" असे ओरडताना ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार होत असताना तिथे बरेच लोक उपस्थित होते. मात्र कोणीही हस्तक्षेप केला नाही आणि त्याला थांबवण्याचे धाडस केले नाही. अनेकजण तर या घटनेचा व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त होते. लोकांच्या उपस्थितच रोहित आरतीवर वार करत होता. दुर्दैवाने, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आरतीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस