शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जमिनी बळकावणारे हात तोडून टाकू - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:25 IST

बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली.

वनगापाडा, तलासरी : बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत तन-मन-धनाने शिवसेनेचे कार्य करणाऱ्या शिवसैनिक व पदाधिकारी यांना धन्यवाद देण्यासाठी येथे आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते. बुलेट ट्रेनबाबत जी जनसुनावणी घेतली. ती मध्ये जर जनतेच्या भावनांचा आणि तिने मांडलेल्या मतांचा विचारच केला जाणार नसेल तर ती घ्यायची कशाला? संपूर्ण अहवाल इंग्रजीत तो ही कुणाच्या हाती नाही अशी स्थितीत त्याची माहिती जनतेला होणार कशी? त्याबाबतचे आक्षेप नोंदवणार तरी कसे असे सवाल त्यांनी केले.१९९६ मध्ये युतीचे सरकार असतांना वाढवण बंदर उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु या बंदराला भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध होता. तेव्हा बाळासाहेबांनी वाढवणला जाऊन जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी मला पाठविले होते. पाहिजे तर आमच्यावर गोळ्या झाडा पण आम्हाला हे बंदर नको आम्ही ते होऊ देणार नाही. अशा त्यांच्या भावना त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहचवल्या, तेव्हा त्यांनी ताबडतोब ते बंदर रद्द करायला लावले अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.बळी घेतल्याशिवाय सरकारला आंदोलकांच्या भावना कळत नाहीत११ आंदोलक गोळीबारात ठार झाल्यानंतर तामिळनाडूमधील स्टरलाईट प्रकल्प रद्द केला गेला. लोकांचे रक्त सांडल्याशिवाय सरकारला त्यांच्या भावनांची तीव्रता कळत नाही काय? असाही सवाल त्यांनी केला. गुरुवारी झालेल्या अमित शहा यांच्यासमवेतच्या चर्चेबाबत ते काही बोलतील अथवा खुलासा करतील अशी सगळ्याच प्रचार माध्यमांची अपेक्षा होती. परंतु त्याबाबत त्यांनी मौन पाळून त्यांची निराशा केली. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे जिल्हासंपर्क प्रमुख विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेशभाई शहा आदी होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे