मुलाचा वडिलांवर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:32 IST2020-03-03T05:32:14+5:302020-03-03T05:32:17+5:30

विरार परिसरात राहणाऱ्या मुलाने वडिलांवर मालमत्तेच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

The boy's father was attacked by a coward | मुलाचा वडिलांवर कोयत्याने हल्ला

मुलाचा वडिलांवर कोयत्याने हल्ला

नालासोपारा : विरार परिसरात राहणाऱ्या मुलाने वडिलांवर मालमत्तेच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.
या प्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली आहे. वडिलांना उपचारासाठी खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे.
विरार पूर्वेकडील डोंगरपाडा परिसरात परशुराम पाटील हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा किरण हा पत्नी व मुलासह वेगळा राहतो. या पिता-पुत्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून संपत्तीचा वाद होता.
यातच मुलाला वडिलांनी न्यायालयातून नोटीस पाठवली होती. याच रागाच्या भरात त्याने वडिलांवर कोयत्याने वार केले आहेत. यात परशुराम यांच्या अंगावर तीन ते चार वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ला करून फरार झालेल्या आरोपी मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही तासांमध्ये अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The boy's father was attacked by a coward