शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत मधूबन भागात फिरायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 22:33 IST

मौजमजेसाठी वसई पूर्वेतील आठ ते दहा मित्र वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गेले असता तिथे एक कन्स्ट्रक्शन साईटवर एक भला मोठा खड्डा पाण्याने भरलेला होता.

ठळक मुद्देवसई पूर्व मधुबन भागातील कन्स्ट्रक्शन साईटवरील दुर्दैवी घटना

वसई : मित्रासोबत फिरायला गेलेल्या आठ ते दहा मित्रांपैकी एका सोळा वर्षीय मुलाचा कन्स्ट्रक्शन साईट वरील मोठ्याला खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सांयकाळी 4.30 च्या सुमारास घडली असून करण तिवारी (वय 16) असे या मृत मुलाचे नाव आहे.

मौजमजेसाठी वसई पूर्वेतील आठ ते दहा मित्र वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गेले असता तिथे एक कन्स्ट्रक्शन साईटवर एक भला मोठा खड्डा पाण्याने भरलेला होता. दरम्यान फिरायला गेलेल्या मित्रांपैकी काही मित्र खड्याच्या काठावर बसून राहिले पण करण तिवारी (वय 16) व त्याचा अजून एका मित्र अशा दोघांनीही  या पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने करणचा पाय या खड्यातील मातीत रुतला. परिणामी खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा अक्षरशः बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या भागातील  स्थानिकानी वसई विरार मनपा अग्निशमन व वालीव पोलिसांना देताच तात्काळ या दोघांनी घटनास्थळी धाव घेत काठी व गळाच्या सहाय्याने या मुलाचा मृतदेह अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.

कन्स्ट्रक्शन कंपनीचा हलगर्जीपणा नडला !

मधुबन भागातील या कन्स्ट्रक्शन साईटवर कुठलेही काम सुरु नव्हते त्यामुळे किमान बंद अवस्थेत असलेल्या साइटवर खड्डा कोणी खोदला व जरी खोदला असला तरी तो बंदिस्त करणे, फलक लावणे किंवा अन्य सुरक्षा म्हणून कुठल्याही प्रकारचे उपाययोजना काहीही नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. याप्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत आता पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे वसई पूर्व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणीDeathमृत्यू