बोर्र्डीचा खुटखाडी पूल वाहतुकीला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:17 IST2019-05-21T23:17:40+5:302019-05-21T23:17:46+5:30
नूतनीकरणानंतर सुसज्ज मार्ग : लोकमतच्या पाठपुराव्याला यशलोकमत न्यूज नेटवर्क

बोर्र्डीचा खुटखाडी पूल वाहतुकीला खुला
बोर्र्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावरील खुटखाडी पूलाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस सज्ज झाला आहे. या पुलाच्या दुरावस्थेमुळे या सागरी पर्यटन स्थळांचा दर्जा असलेल्या गावांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान लोकमतने सातत्याने हा विषय लावून धरला होता.
महाराष्ट्र गुजरात सीमेलगत डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर घोलवड आणि बोर्डी या गावच्या वेशिवर खुटखाडी हा पूल आहे. पर्यटन, कृषी मालाची निर्यात, सीमा भाग आणि समुद्रकिनारपट्टीची सुरक्षा या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे सुरक्षा कठडे जमीनदोस्त झाले होते तर उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलाच्या पाच फूट उंचीवरून पुराचे पाणी जायचे. शिवाय अरु ंद असल्याने वाहनांचे अपघात घडून जीवितहानी सुद्धा झाली आहे. याबाबत नूतनीकरणाची मागणी पूर्ण होत नव्हती. या समस्येवर लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला तर बोर्डी येथे ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माअंतर्गत स्थानिकांनी ही समस्या मांडली होती. या पाठपुराव्याला यश आले असून पुलाचे बांधकाम दोन महिन्यात पूर्ण होऊन, तो वाहतुकीस खुला करण्यात आला.
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माचे यश
बोर्डी येथील कार्यक्र मात झाई गावातील पुलाचा प्रश्न अमनबेन माच्छी आणि बोर्र्डीच्या पुलाविषयी राकेश सावे या स्थानिकांनी मुद्दा उपस्थित करून त्याचे निवारण करण्याची मागणी केली होती. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. झाई येथे दीड कोटी तर बोर्र्डीला सुमारे दोन कोटी रकमेच्या पुलाचे बांधकाम झालेले आहे.