बोर्डीतील विवाहितेच्या आत्महत्येचे कोडे वाढले
By Admin | Updated: March 19, 2016 00:08 IST2016-03-19T00:08:29+5:302016-03-19T00:08:29+5:30
बोर्डीतील दोन मजली इमारतीच्या छतावरून पडल्याने गुरुवार, १७ मार्च रोजी योगिनी हर्षद निजप या ३२ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मूलबाळ होत

बोर्डीतील विवाहितेच्या आत्महत्येचे कोडे वाढले
बोर्डी : बोर्डीतील दोन मजली इमारतीच्या छतावरून पडल्याने गुरुवार, १७ मार्च रोजी योगिनी हर्षद निजप या ३२ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मूलबाळ होत नसल्याने योगिनीने आत्महत्या केली असावी, अशी माहिती प्राथमिक तपासात घोलवड पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान, अपघाताच्या दिवशी गुरुवार, १७ मार्च रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास मयत महिलेने सासू पुष्पा हिच्यासह रमेश आरेकर यांच्या दोन मजली इमारतीत प्रवेश केला होता. किंबहुना, रमेश आरेकर यांचा मुलगा सागर याच्याकडून इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी पुष्पानेच मागितल्याचे सागरने लोकमतला माहिती देताना सांगितले आहे. शिवाय, त्या दोघींना इमारतीत प्रवेश करताना निलेश वरठा या प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. सदर इमारतीच्या खालच्या मजल्यावर बँक आॅफ बडोदाची बोर्डी शाखा आहे. प्रत्यक्षदर्शी निलेश वरठा हा सदर बँकेच्या एटीएमचा सुरक्षारक्षक असून घटनास्थळी हजर होता. या प्रकरणात तपासाकरिता बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची मदतही घोलवड पोलिसांना होऊ शकते. योगिनीला आत्महत्या करायची होती तर तिने तिऱ्हाईत व्यक्तीची इमारत का निवडली? सासूने इमारत प्रवेशाची परवानगी का मागितली? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. दरम्यान, अपघात घडल्याच्या दिवशी मयत योगिनीचा पती नोकरीनिमित्त बाहेर होता. (वार्ताहर)