बोईसरमध्ये अतिक्रमणे हटविली

By Admin | Updated: April 6, 2016 01:53 IST2016-04-06T01:53:21+5:302016-04-06T01:53:21+5:30

सरावली ग्रामपंचायतीने बोईसर पोलीसांच्या सहाय्याने नवापुर नाका ते तारापूर एम.आय.डी.सी. या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील धोडीपूजा पासून

In Boiser the encroach was deleted | बोईसरमध्ये अतिक्रमणे हटविली

बोईसरमध्ये अतिक्रमणे हटविली

बोईसर : सरावली ग्रामपंचायतीने बोईसर पोलीसांच्या सहाय्याने नवापुर नाका ते तारापूर एम.आय.डी.सी. या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील धोडीपूजा पासून अवधनगर व महावीर चेंबर दरम्यानच्या अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावरच पार्कींग केलेली वाहने, विक्रेते व फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा केला असून धडक मोहिम ही सलग राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) सुमारे सहा कोटी रू. खर्चून एमआयडीसी टाकी नाका ते बोईसर नवापूर नाक्यादरम्यान सतराशे पन्नास मिटर लांबीचा व सात व सात मीटर रूंदीचा रस्ता बांधला आहे. रस्त्याच्या मध्यभागी एक मिटरचा डिव्हायडर तर दिड-दिड मीटर रूंदीचे गटार व त्यावर फुटपाथ बांधला आहे. हा रस्ता अनेक अडचणींवर मात करून बांधण्यात आला होता.
परंतु त्याचा बहुसंख्य भाग अनधिकृत टपऱ्या, वेड्यावाकड्या पद्धतीने उभी केलेली वाहने, फेरीवाले, विक्रेते यांनी व्यापल्याने चौपदरी रस्त्याचे रूपांतर एकेरी रस्त्यात झाले होते. वाहतूक खोळंबून अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली होती तर मागील महिन्यात याच रस्त्यावर एकाच वेळी दोघांचा अपघाती बळी गेला होता.
अनधिकृतपणे सर्वांनी रस्ता व्यापल्याने एमआयडीसीच्या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या लाखो कामगार व वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागून वेळेचाही अपव्यय होत होता.
या सर्वांची गांभिर्याने दखल सरावली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैभवी राऊत, उपसरपंच अशोक शाळुके, सदस्य सुरेश सहानी, शितल गोवारी, विजय राऊत, इ. नी बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक के. एस. हेगाजे व पोलीस फोर्सच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने टपऱ्या उचलून नेल्या. त्या मोहिमेत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ यांनीही महत्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)

Web Title: In Boiser the encroach was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.