शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरमध्ये महायुतीची बविआवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:55 IST

बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

- पंकज राऊतलोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना-भाजप युतीने २८ हजार १७२ मतांचे मताधिक्य मिळवून बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.लोकसभेच्या पालघर मतदार संघात पालघर, वसई, नालासोपारा, विक्रमगड, डहाणू व बोईसर अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर तर बोईसरचे आमदार विलास तरे असे तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत.या तीन पैकी वसई विधानसभा व्यतिरिक्त नालासोपारा २४ हजार ६७० तर बोईसर मध्ये २८ हजार १७२ इतकी जास्त मते शिवसेना-भाजप महायुतिचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मिळाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात बविआची पीछेहाट झाली मात्र बवीआला पाठिंबा दिलेल्या माकपा, काँग्रेस राष्ट्रवादी व अन्य पक्ष संघटने मुळे डहाणू व विक्र मगड विधानसभा क्षेत्रात कधी न मिळालेले मताधिक्य बवीआला मिळाले ही जमेची बाजू आहे.बहुजनाचा विकास हाच प्रगतीचा प्रकाश हा उद्देश ठेवून बहुजन विकास आघाडी नेहमी राजकीय व सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी जिल्हास्तरीय पक्ष म्हणून २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकी पासून बहुजन विकास आघाडी कडे पाहिले जाते बविआची वसई विरार महानगरपालिकेवर प्रथम पासून मजबूत पकड असून बवीआचे आ. विलास तरे बोईसर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणुकीत १३०७८ तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये १२८७३ मताधिक्य मिळवून सलग दोन वेळा निवडून आले आहेत.पालघर लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत बवीआचे बळीराम जाधव १२३६० मताधिक्य ने निवडून आले होते तेव्हा बोईसर विधानसभा मतदार संघातून त्यांना ५७९१ मताधिक्य मिळाले होते मात्र त्या नंतर लोकसभेच्या २०१४,१८ (पोट निवडणूक) व २०१९ या दोन निवडणुकीत बोईसर विधानसभा मतदार संघातून बवीआला मताधिक्य मिळाले नव्हते. जनमनाचा व सर्वसामान्यांच्या समस्या व अडचणी चा कानोसा घेऊन त्यांच्या ज्वलंत प्रश्नावर विधानसभेत अनेक वेळा आ. तरे यांनी आवाज उठवला परंतु केलेल्या कामाची प्रसिद्धी तसेच प्रसारमाध्यमांचा वापर करून घेण्यात आलेले अपयश त्यामुळे केलेली कामे मतदारा पर्यंत पोहचत नसल्याने बविआची पिछेहाट झाली.।विलास तरेंना फाजील आत्मविश्वास नडलाआपला मतदारसंघ बविआचा बालेकिल्ला आहे. आपल्याला प्रसार माध्यमांची गरज नाही अशा भ्रमात तरे हे वावरत असतात. माध्यमांशी संवाद साधणे त्यांना कधीच पसंत नसते. माध्यमांना सहकार्य करणे तर त्यांच्या गावीही नसते. आप्पा सारे काही पाहून घेतील आपण काहीही करायची गरज नाही अशाच समजूतीत ते वावरतात. हीच बाब त्यांना लोकसभेला नडली. आता विधानसभेलाही नडण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.