बायकोवर फेकले उकळते दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:47 IST2019-05-26T05:46:59+5:302019-05-26T05:47:01+5:30
पत्नीवर पतीने उकळते दूध फेकून भाजण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली

बायकोवर फेकले उकळते दूध
नालासोपारा : पत्नीवर पतीने उकळते दूध फेकून भाजण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात ती गंभीर भाजल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले होते. गुरूवारी रात्री तिने तुळींज पोलीसांत तक्रार दिल्यावर नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला.
रिनाचे (२७) संदीप पांडेसोबत (३०) सप्टेंबर २०१० मध्ये लग्न झाले होते. नवीन रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये व रूम घेण्यासाठी दीड लाख रुपये आण असा तगादा संदीपने लावला. तिने नकार दिल्यावर मारहाण व शिविगाळ करीत होता. गेल्या महिन्यात संदीप, सासरा आनंद, सासू कविता आणि नणंद छाया यांनी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले दूध रिनाच्या अंगावर टाकल्याने ती गंभीर भाजली होती. तिला धमकी देऊन घरामध्ये कोंडून ठेवले होते. नंतर रिनाने हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन बरे झाल्यानंतर गुरुवारी तक्रार दिली.