शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

बोगस दस्तावेज, शिक्के गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:28 IST

उधवा ग्रामपंचायतीतील वास्तव : प्रकरण तलासरी पोलीस ठाण्यात

तलासरी : उधवा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नोंदपुस्तक, शिक्के व महत्त्वाचे दस्तऐवज बनवट बनवून ते बनावट असल्याचे माहिती असतांनाही कब्जात बाळगून ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात उधवा ग्रामपंचायतमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामविकास अधिकारी गणपत गवळी यांनी तलासरी पोलिस ठाण्यात ही तक्र ार केली असून तक्र ारीत असे नमूद करण्यात आले आहे की उधवा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. १५०/३ क्षेत्र ०.३१.० मध्ये बांधकामासाठी परवानगी दिल्याबाबत देवराम कुरकुटे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्याआधारे देण्यात आलेल्या कागदपत्रांची ग्रामपंचायत इतिवृत्तामध्ये पडताळणी केली असता सदर सर्व्हेे नंबर करीता वाणिज्य व रहिवासी प्रयोजनार्थ बांधकाम परवानगी देण्यात आली नसल्याचे आढळून आले. तसेच ग्रामपंचायतकडे सादर केलेल्या नाहरकत दाखल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खोटी सही शिक्क्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे गुलाब बाबू धांगडा ही महिला सरपंच नसतांना तिच्या खोट्या सहीचा वापर करून नाहरकत दाखला तयार केल्या असल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बजरंगबली गुलाबचंद शहा व बबलू बिहारी गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तलासरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.बनावट कागदपत्रे बनविणारी टोळी कार्यरतउधवा ग्रामपंचायत हद्दीतील बनावट अकृषिक प्रमाणपत्राच्या आधारे मशिदीचे बांधकाम करण्याचे प्रकरण ताजे असून त्याबाबतही तलासरी पोलिसामार्फत तपास करण्यात येत आहे. बनावट कागदपत्रे, शिक्के, सही यांचा वापर करून जमिनी फेरफार, जमीन विक्र ी, जमीन बिनशेती करणे अशी प्रकरणे उजेडात येत असून पालघर जिल्ह्यात बनावट कागदपत्रे तयार करणारी मोठी टोळी सक्रि य आहे. त्याचप्रमाणे बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी स्थानिक शासकीय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही सामील असावेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी