शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहावर बलात्कार करणारा अटकेत, चेन्नईतून होता फरार, विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 10:55 IST

चेन्नईच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील आठवड्यात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली होती.

नालासोपारा : चेन्नईत मागील आठवड्यात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी फरार असणाऱ्या आरोपीला पकडण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. आरोपी राजू नायर याला शुक्रवारी पकडून तपास व चौकशीसाठी कोणामल्ली पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.चेन्नईच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील आठवड्यात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तो विरार परिसरात कोठेतरी राहत असल्याची माहिती घेऊन आलेल्या तपास टीमने विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांकडे मदत मागितली. त्यानुसार गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या पथकासोबत विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी आरोपी हा फुलपाडा परिसरातील सुजाता अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली.ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, सहायक फौजदार सुरेंद्र शिवदे, अंमलदार सागर घुगरकर, युवराज वाघमोडे, सुनील पाटील यांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीचे ट्रान्झिट वॉरंट वसई न्यायालय येथून घेऊन चेन्नई पोलिस आरोपीला घेऊन गेल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार