शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या समुद्रात बोट उलटली; एकजण मृत्युमुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:45 IST

अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यामुळे यात साध्या बोटीला खडकाची धडक लागून बोट समुद्रात पलटी झाली.

 वसई  -  वसईच्या रानगाव येथून पोशापीर खडक असलेल्या बेटावर समुद्रात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट खडकाला धडकून उलटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत स्टीवन कुटिनो या 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 5 जणांची सुखरूप सुटका झाली असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी लोकमत ला दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास वसई, रानगाव आणि गिरिज येथे राहणा-या सहा मित्रांचा एक ग्रुप फिशिंगसाठी समुद्रात निघाला होता. यासाठी एक साधी बोट व एक मशीनची अशा दोन बोटी घेऊन ते भल्या पहाटे रानगावहून समुद्रात निघाले होते. 

समुद्रात फिशिंग करून झाल्यानंतर ही टीम दुपारी 3 च्या सुमारास पोशापीर खडक बेटाच्या येथून परतत असताना अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यामुळे यात साध्या बोटीला खडकाची धडक लागून ती बोट समुद्रात पलटी झाली. दुसऱ्या बोटीत असलेल्या मित्रांनी या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला दोघांना  वाचवण्यात यश आले.

मात्र स्टीवन कुटिनो (37 ) रा,गिरीज या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर आशुतोष या तरुणाच्या पोटात पाणी गेल्याने त्याला उपचारांसाठी वसईच्या डी.एम. पेटिट रुग्णाल्यात दाखल करण्यात आले. या एकूणच घटनेची माहिती वसई पोलीस ठाणे, अग्निशमन टीम आदींना समजल्यावर या रेस्क्यू टीमने यातील 5 जणांना सुखरूप व सुरक्षित स्थळी आणले,मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. स्टीव्हन याच्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAccidentअपघातDeathमृत्यू