विरार चंदनसार येथे गळा आवळून तरूणाचा खून

By Admin | Updated: November 4, 2015 00:25 IST2015-11-04T00:25:05+5:302015-11-04T00:25:05+5:30

विरार पुर्व भागातील चंदनसार कातकरीपाडा या ठिकाणी नदीम शेख या तरूणाचा खुन करण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. कातकरीपाडा (चिंचपाडा) या ठिकाणी

Blood clothed in the heart of Virar Chandansar | विरार चंदनसार येथे गळा आवळून तरूणाचा खून

विरार चंदनसार येथे गळा आवळून तरूणाचा खून

पारोळ : विरार पुर्व भागातील चंदनसार कातकरीपाडा या ठिकाणी नदीम शेख या तरूणाचा खुन करण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. कातकरीपाडा (चिंचपाडा) या ठिकाणी तो राहत होता. मंगळवारी पहाटे त्यांच्या शेजाऱ्याना तो मृत अवस्थेत त्यांच्या रूमसमोर दिसला. सदर घटनेची खबर पोलीसांना दिली असता विरार पोलीस घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर काळी खूण आढळल्याने दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा पोलीसांनी अंदाज वर्तवला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या तपास सुरू आहे.

Web Title: Blood clothed in the heart of Virar Chandansar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.