बोर्डीत पर्यटकांची धूम
By Admin | Updated: December 29, 2015 00:08 IST2015-12-29T00:08:38+5:302015-12-29T00:08:38+5:30
निळेशार पाणी, अथांग समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, कांदळवन, नारळ-चिकूच्या वाड्या, सुरूची गर्द हिरवाई आणि पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने बोर्डी पर्यटनस्थळी सागरी, ग्रामीण व कृषी इ.

बोर्डीत पर्यटकांची धूम
बोर्डी : निळेशार पाणी, अथांग समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, कांदळवन, नारळ-चिकूच्या वाड्या, सुरूची गर्द हिरवाई आणि पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने बोर्डी पर्यटनस्थळी सागरी, ग्रामीण व कृषी इ. पर्यटनाचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे देशभरातून पर्यटक बोर्डीत दाखल झाले असून त्यांचा ओघ सुरूच आहे. आगामी काळात नवीनवर्ष साजरे करण्याकरीता बोर्डी पर्यटकांनी गजबजली आहे.
बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड इ. गावांना अथांग समुद्रकिनारा, नारळ-चिकूच्या वाड्यांसह सुरूंचे गर्दबनाचा ठेवा लाभला आहे. मऊशार वाळू, लांबच लांब चौपाटीवर चालणे, उंट व घोड्यांवरून भ्रमंती करणे हे उपलब्ध असले तरी या पर्यटनस्थळी बोटींग, पॅराग्लायडींग, बनाना रायडिंग, इ. चा अभाव आहे. मात्र निसर्गाने मुक्त उधळण केल्यामुळे आकर्षण वाढल्याचे अबाल-वृद्ध तसेच कपल्सचे म्हणणे आहे. बोरीगाव, रामपूर, कोसबाड या पश्चिम घाटात वसलेल्या गावांमध्ये कृषी, ग्रामीण व आदिवासी पर्यटन केंद्राचा विकास झाला आहे. सेंद्रीय शेती, गोठा, वाडी, पाडा संस्कृती आदिवासी कल्प, इ. प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. फुल व फळ रोपवाटीका, वन विभागाचे निसर्गउद्यान पाहता येते. असल्याने मुंबई, सुरत, अहमदाबाद इ. शहराप्रमाणेच परराज्यातील पर्यटक पसंती देताना दिसून येत आहेत. मागील काही वर्षापासून पर्यटकांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात घोलवड पोलीसांना कसरत करावी लागणार आहे. मोकळ्या जागांना वाहनतळाचे स्वरूप येणार आहे.
पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेबाबत उपाय अवलंबिले आहेत.
- जी. बांगर, स. पो. निरीक्षक घोलवड