शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

भाजपचे नेते ओवळा माजिवडा मतदारसंघात राहतात, पण त्यांनी केले मीरा भाईंदरमध्ये मतदान; मुझफ्फर हुसेन यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:41 IST

मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- भाजपाच्या माजी महापौर आणि आ. मेहतांच्या भावजय सह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी हे अनेक वर्ष १४६ ओवळा माजिवडा दुसऱ्या मतदारसंघात राहतात व तिकडे पण मतदार यादीत त्यांची नावे आहेत. मात्र १४५ मीरा भाईंदर विधानसभेच्या मतदार यादी आणि पुरवणी यादीत असंख्य नावे निवडणूक आयोग आणि बीएलओ यांच्या संगनमताने नोंदवली. मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे. 

भाजपच्या माजी महापौर आणि आ. नरेंद्र मेहतांच्या सख्ख्या भावजय डिम्पल विनोद मेहता ह्या मीरारोडच्या जुन्या गोल्डन नेस्ट जवळ अनेक वर्षां पासून कुटुंबासह राहतात जो ओवळा माजिवडा विधानसभा १४६ मध्ये येतो. तेथे मतदार यादी  क्र. १२० अनु क्र. ४१२ वर त्यांचे नाव आहे. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत त्या राहत असलेल्या १४६ विधानसभा मधील पालिका प्रभाग १२ मधून निवडून आल्या होत्या. 

डिम्पल यांचे १४५ मीरा भाईंदर मतदारसंघाच्या यादीत पण नाव आहे. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी ते रहात असलेल्या १४६ मतदार संघात मतदान केले नाही तर त्यांचे दिर भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता निवडणूक लढवत असलेल्या १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात मतदान केले. भाईंदर पूर्वेच्या खारीगाव येथील मां भारती हायस्कुल,रूम नंबर ३ मध्ये मतदान केले आहे. डिम्पल यांचे पती आणि आ. मेहतांचे सख्खे भाऊ विनोद यांचे नाव पण १४५ विधानसभा यादीत आहे. 

या शिवाय मेहता समर्थक भाजपचे माजी नगरसेवक संजय थेराडे व पत्नी वनिता हे १४६ मतदार संघात अनेक वर्ष कुटुंबासह राहतात आणि संजय हे २०१७ साली तिकडूनच नगरसेवक झाले असताना गेल्या विधानसभा निवडणुकीच्या यादीत थेराडे दाम्पत्याचे नाव १४५ मीरा भाईंदर मतदार संघात नोंदवले गेले. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील घरचा पत्ता ४ थ्या मजल्याचा असला तरी त्या नावाची इमारत नाही आणि नावाचे साधर्म्य असलेली इमारत हि ३ मजली आहे. 

आ. मेहता यांचे समर्थक माजी नगरसेविका कुसुम गुप्ता व पती संतोष गुप्ता, रविकांत उपाध्याय व पत्नी शीतल उपाध्याय. आ. मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचे संचालक असलेले संजय सखाराम सुर्वे आदी १४६ मतदार संघात राहतात व त्या मतदार यादीत त्यांची नावे असताना त्यांची नावे मीरा भाईंदर १४५ विधानसभा मतदार संघात पण नोंदवली गेली आहेत. 

एकूणच मेहता व त्यांच्या नातलग, निकटवर्तीयांनी विधानसभा निवडणुकीत गैरमार्गाने निवडून येण्यासाठी ते रहात असलेल्या १४६ विधानसभा मतदार संघात त्यांची नांवे असल्याची पूर्ण कल्पना असताना देखील  गुन्हेगारी प्रवृत्तीने संगनमताने कटकारस्थान करून १४५ मतदार संघात मतदान केले.  दुबार मतदार नावे बाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही. भाजप च्या लोकप्रतिनिधीनी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वोट चोरी व भ्रष्ट गैरप्रकार केला आहे. माजी महापौर, माजी नगरसेवक सारख्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार राजकीय लोकांनी दोन्ही मतदार संघात नावे नोंदवून लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ह्या बाबत माहिती देताना माजी आमदार व काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केली. 

दरम्यान आ. मेहतांनी माध्यमांशी बोलताना मुझफ्फर यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. डिम्पल ह्या लग्ना आधी तिकडे रहात होत्या मात्र त्यांचे नाव तिकडे कडे राहिले माहिती नाही. त्यांना निवडणूक आयोग कडून ऑनलाईन स्लिप मिळाली व त्या नुसार त्यांनी तिकडे मतदान केले. त्यांनी दोन वेळा मतदान केले नाही. मी ६४ हजार मतांनी जिंकलोय ६०० मतांनी नाही.  मतदार यादीत दुबार नावे ही निवडणूक याद्यां मधील तांत्रिक चुका आहेत असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP leader voted in Mira Bhainder despite residing elsewhere: Allegation

Web Summary : Congress leader Hussain alleges BJP's Mehta won via voter fraud. Relatives residing in Owala Majiwada voted in Mira Bhainder. Double voting accusations surface; Mehta denies claims, citing technical errors.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस