शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

By नितीन पंडित | Updated: September 30, 2023 21:46 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : देशातील छोटे उद्योग डबघाईला आले असून शेतकरी,कामगार,युवकांचे असंख्ये प्रश्न आजही प्रलंबित असून राज्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनली असतांनाच मागील दहा वर्षांच्या काळात छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.भिवंडीत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी पटोले शनिवारी भिवंडीत आले होते. यावेळी काँग्रेस मध्यवर्ती शहर कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  भिवंडीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या या बुनकर मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. त्यानंतर पटोले यांनी सभेचे आयोजन होणाऱ्या टावरे स्टेडियमची पाहणी केली.

त्यानंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला. राज्यातील शिंदे सरकारने दीड वर्षांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसून राज्यातील जवळपास १७ मंत्री पदे रिक्त असल्याने एका एका मंत्राकडेच पाच ते सहा खाती असल्याने सामान्य नागरिकांचे मूळ प्रश्न सुटत नसल्याची टीकाही यावेळी पटोले यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत विचारले असता, भाजप सरकार जुमले करण्यात एक्सपर्ट असून ही वाघ नखे नक्की खरी की खोटी याचे निष्कर्ष कोण काढणार असा सवाल पटोले यांनी उपस्थित करत राज्यात कंत्राटी भरती करून युवकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून राज्यात कंत्राट भरती नको उलट सरकारी नोकर भरती करणे गरजेचे असून युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही असा इशारा देखील पटोले यांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपा