वसईतील अनैतिक धंद्याविरोधात भाजपा आक्रमक
By Admin | Updated: February 13, 2017 04:42 IST2017-02-13T04:42:15+5:302017-02-13T04:42:15+5:30
अनैतिक धंदयांना वसईत पोलिसांचेच संरक्षण असल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर भाजपाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

वसईतील अनैतिक धंद्याविरोधात भाजपा आक्रमक
वसई : अनैतिक धंदयांना वसईत पोलिसांचेच संरक्षण असल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर भाजपाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी भाजपा पालकमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्र्यांना वसईतील कायदा व सुव्यवस्थेची माहिती देणार असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले. लोकमतने चव्हाट्यावर आणलेल्या वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थ विक्रीचा विषय खूप गंभीर आहे. कुंपणच शेत खातेय असा हा प्रकार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. वरिष्ठांनी याची गंभीर दाखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. नाहीतर पक्ष म्हणून हा विषय मंत्रालयामध्ये घेऊन जाणारच आहोत, असे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)