शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बविआ आमदार विलास तरे शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 5:20 AM

विधानसभेच्या तोंडावर धक्का : ‘भगवान भला करे’ची ठाकुरांची प्रतिक्रिया

पालघर/बोईसर : वसई-विरारनंतर बहुजन विकास आघाडीने बालेकिल्ला म्हणून घडविलेल्या बोईसरमधील त्या पक्षाचे आमदार विलास तरे यांनी रविवारी संध्याकाळी समर्थकांसह ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर लोकसभेची पोटनिवडणूक आणि नंतरच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला युतीने धक्का दिला. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर त्या पक्षाला हा मोठा हादरा मानला जातो.

तरे यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. ‘भगवान उसका भला करें’ अशी प्रतिक्रि या बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. विलास तरे हे शिवसेनेकडून २००४ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. २००९ ते २०१९ या दहा वर्षांत अशा दोन वेळा ते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून विधानसभेवर निवडून गेले.सध्याची युतीची भक्कम स्थिती पाहता काही महिन्यांपासून ते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक होते. शिवसेनेतर्फे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सध्या ठाण्यासोबत पालघरचीही जबाबदारी आहे. या दोन्ही जिल्ह्यांतून सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातूनच तरे यांची घरवापसी झाल्याचे मानले जाते. यावेळी बोईसर पूर्व, वालीव भागातील तरे यांचे समर्थक हजर होते. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, तालुकाध्यक्ष विकास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेत तरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याचे सांगितले जाते.

हितेंद्र ठाकुरांच्या कोंडीचे प्रयत्नवसई, विरार, नालासोपारा हा परिसर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यापाठोपाठ बोईसर विधानसभा मतदारसंघात त्या पक्षाने पाय रोवले. ज्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्ये त्यांना हवा तसा विस्तार करता आला नाही, तशीच काहीशी अवस्था जिल्ह्याच्या अन्य भागातही होती. बविआच्या ताब्यात सध्या वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघात हादरा देण्याचे प्रयत्न भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. यापूर्वी ठाकूर यांचा पराभव करणारे श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. वसईतून त्यांना पुन्हा विधानसभेसाठी उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसई परिसरातील ख्रिस्ती समाजाने ठाकूर यांच्याविरोधात पंडित यांना यापूर्वी पाठिंबा दिला होता. पंडित पूर्वी शिवसेनेचे उपनेते होते. त्यांच्या संघटनेने जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत केली होती. नालासोपारा मतदारसंघात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उभे केले जाईल, अशी चर्चा आहे. बोईसरमधील त्या पक्षाच्या विद्यमान आमदारालाच फोडण्यात आले आहे. यातून ठाकूर यांच्यासह त्यांच्या पक्षाची कोंडी करत त्यांना बालेकिल्ल्यातच नामोहरम करण्याची व्यूहरचना युुतीच्या नेत्यांनी केली आहे.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरShiv Senaशिवसेना