शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 14:25 IST

मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास  दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता.

पालघर / मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर हात नदी पुलावरील वळणावर गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कारचालकाने दुचाकीला धडक दिल्यानंतर तडफडणाऱ्या तरुणाला उपचाराची गरज असताना आरोपी चालकाने पळ काढला. त्यामुळे उपचाराअभावी दुचाकीस्वार सागर गजानन पाटील (वय २८, रा. चांबळे, ता. वाडा) याचा मृत्यू झाला. 

मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास  दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता. हात नदी पुलालगतच्या वळणावर तो पोहोचला असता समोरून आलेल्या कारचालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने तो रस्त्याच्या कडेला फेकला. रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी कारमध्ये बसलेले सर्व पळून गेले. 

नातेवाइक संतप्त मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलिस गुन्हा दाखल करीत नसल्याने नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात येऊन जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाइकांनी या प्रकरणातील कारमालकाचा शोध घेत त्यातील चार तरुणांचा शोध लावला. त्यातील सचिन सुरवशे या तरुणाने आपण हा अपघात केल्याचे मान्य करीत गुन्हा कबूल केला. परंतु या प्रकरणात चालक दुसराच व्यक्ती असल्याने आणि त्याने मद्यपान केल्याने त्याला वाचविण्यासाठी सचिन पुढे येत आल्याचा संशय घेतला आहे. सीसीटीव्ही तपासात सचिन हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. 

सचिन सुरवशे हाच चालक असून, त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व तरुणांचे, गाडीमालकांची वैद्यकीय तपासणी केली आहे. - सतीश शिवरकर, पोलिस निरीक्षक, मनोर.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू