शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चिंबोऱ्या, पावसाळी मुठयांना खवैय्यांकडून मोठी मागणी

By admin | Updated: July 6, 2016 02:24 IST

पावसाळा सुरु झाला की, साऱ्यांनाच वेध लागतात ते रानभाज्यासोबत काळयाभोर चिंंबोऱ्या आणि मुठ्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणाऱ्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) सद्यस्थितीत

- राहुल वाडेकर, विक्रमगड

पावसाळा सुरु झाला की, साऱ्यांनाच वेध लागतात ते रानभाज्यासोबत काळयाभोर चिंंबोऱ्या आणि मुठ्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणाऱ्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) सद्यस्थितीत विक्रमगड बाजारात दिसू लागले आहेत. तालुक्यातील खेड्या-पाड्यातील आदिवासी रात्रभर पावसात फिरुन त्यांना पकडत असतात. मात्र, त्यांना हवा तसा पैसा यातून मिळत नसल्याने आता हा पावसाळ्यातील मेवा विक्रीसाठी शहराकडे वळू लागला आहे.सध्या समुद्रात मासेमारी बंद असल्याने व पावसाळयात सापडणाऱ्या चिंंबोऱ्या भरलेल्या असल्याने त्यांना अधिक चव असते शहरीभागातून त्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. चिंंबोऱ्या किंवा खेकडे (मुठे) हे उभयचर प्राणी वर्गात येतात. पाणी आणि जमीन हे त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. मांसाहार करणाऱ्यांना मच्छी मटणापेक्षाही पावसाळयात सुरुवातीला मिळणाऱ्या काळया चिंंबोऱ्या किंवा खेकडयांचा (मुठे) झणझणीत रस्सा अधिक रूचकर वाटत असल्याने पावसाळा सुरु झाला की, खवय्ये बाजाराकडे धाव घेतात. फक्त पावसाळयातच चिंंबोऱ्या मिळत असल्याने दोन-तीन महिनेच आदिवासींना यातून रोजगार मिळतो. चिंंबोऱ्या आणि खेकडयांची मागणी वाढत असली तरी आजच्या महागाईत आदिवासींना यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. मात्र शेती आणि पशुपालनासोबत हंगामी व्यवसाय म्हणून आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी निसर्गाने देऊ केलेली ही साधनसंपत्ती निश्चितच फायदेशीर ठरत आहे हे मात्र तितकेच खरे आहे.चिंबोऱ्या, मुठे पकडण्यासाठीही लागते मोठे कौशल्यसध्या बाजारात या चिंबोऱ्यांची आवक सुरु झाली असून या चिंंबोऱ्या किंवा खेकडे पकडणे हे देखील एक कौशल्यच (कसबच) आहे. आदिवासंीनी हे कसब सहज अवगत केले आहे. रात्री पलिते (मशाल)किंवा गॅसबत्ती घेऊन ते आपल्या मोहीमेवर निघतात.चिंबोऱ्या पकडण्यासाठी लोखंडी शिगेचा वापर केला जातो. अथक परिश्रम केल्यानंतर मिळालेल्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) व्यवस्थित जुडयात बांधून ते बाजारात किंवा खरेदी करणाऱ्यांच्या घरी जाऊन विक्री करतात. समुद्रातील किंवा खाडीच्या चिंबोऱ्यांपेक्षा या चिंंबोऱ्यांना पावसाळ्यात अधिक मागणी असते. सहा चिंंबोऱ्यांसाठी १०० ते १५० रुपये व १०० रुपये डझनप्रमाणे खेकडयांची विक्री केली जाते. निसर्गाकडून मिळणारी ही प्राणी संपदा आदिवासींच्या उपजिवीकेला मोठा हातभार लावत आहे. रात्रीचे परिश्रम आणि दिवसभराच्या विक्रीतून ४०० ते ५०० रुपये या आदिवासींच्या पदारात पडतात.