भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: July 8, 2015 22:02 IST2015-07-08T22:02:46+5:302015-07-08T22:02:46+5:30
भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत.

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा
वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने येथील नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बांधा-वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर शासनाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले आहे शासनाने या कामासाठी २२ महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता मात्र चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्यावरील सुमारे १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत अद्यापही दुपदरी रस्ताच आहे. वनविभागाची परवानगी मिळून सहा महिने उलटले तरी कामाचा येथे पत्ताच नाही. तसेच या मार्गावरील देहर्जे, पिंजाळ या नद्यांवरील पुल अपुर्ण अवस्थेत आहेत.
एकंदरीत सुप्रीम कंपनीच्या रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याने अपघात होऊन अनेक निष्पाप नागरीक बळी गेले आहेत तर अनेक जायबंदी झाले आहेत. नुकताच कंचाडफाटा येथे खड्ड्यामुळे नितीन भानुशाली या इसमाचा अपघात होऊन गंभीर जखमी झाला आहे.
अंबाडी ते वाडा हा १७ ते २० कि. मी. अंतराच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता उखडून खड्ड्यात गेला आहे. खड्डा पडला की त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून खड्डा भरला जातो. त्या ठिकाणी पॅच मारला जातो त्यामुळे या रस्त्याची लेव्हल बिघडली आहे नारे या गावाच्या हद्दीतील महाराष्ट्र पॉवर कंपनी समोर रस्ता अतिशय खराब आहे.