शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण 

By धीरज परब | Updated: March 1, 2024 18:09 IST

भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते.

मीरारोड - एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ओळख पटलेल्या अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यास आलेल्या भाईंदर पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांना भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टीत एकाने ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. बावन जिनालय जैन मंदिर मागे डॉ. बाबासाहेब आंबडेकर ६० फुटी मार्गावरील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये अंदाजे १६ ते १७ वर्षांचा दुचाकी चोरी करणारा संशयित दिसून आला. 

फुटेज वरून त्याची माहिती घेतली असता पोलीस हे गणेशदेवल नगर मधील गल्ली क्र. २ मी तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते. फुटेज मधील संशियताची खात्री पटल्याने त्याला ताब्यात घेत असताना त्याठिकाणी अयोध्या मिश्रीलाल गुप्ता मूळ रा. गाझीपूर , उत्तरप्रदेश हा आला. त्याने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले.  पोलिसांच्या आरोपी नेण्याच्या कामात अडथळा आणून पवार यांना शिवीगाळ करत त्यांची कॉलर धरली. त्यांना धक्काबुक्की करत चापटाने व बुक्क्यांनी मारहाण केली. शिपाई सलमान पटवे हे पुढे आले असता त्यांना देखील पोटात बुक्के मारून ढकलून दिले. पोलिसांना अर्वाच्च शिव्या देत अरेरावी केली. 

पवार यांनी बीटमार्शल रवींद्र वाघ व श्रीराम वीर यांना कॉल करून बोलावून घेतले. ते आल्या नंतर अयोध्या गुप्ता ह्याला ताब्यात घेऊन २८ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिसांवर झालेल्या ह्या हल्ल्याने पोलीस वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस