वाघ प्रकल्पाचा फायदा कमी; तोटा जास्त
By Admin | Updated: October 6, 2015 23:18 IST2015-10-06T23:18:51+5:302015-10-06T23:18:51+5:30
मोखाडा शहर व लगतच्या गावपाड्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून १९९४ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्याजवळ मोठे धरण बांधण्यात

वाघ प्रकल्पाचा फायदा कमी; तोटा जास्त
मोखाडा : मोखाडा शहर व लगतच्या गावपाड्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून १९९४ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्याजवळ मोठे धरण बांधण्यात आले. मात्र, आजपर्यंत या धरणाचा फायदा किती हा प्रश्न कायमच आहे.
१२ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही या धरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालेला नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला. न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा आल्याने त्यांच्या हाताला अद्याप काही लागलेले नाही. यामुळे संताप व्यक्त होत असून अनेक आदिवासी शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.
मोखाडा शहरापासून ४ ते ५ किमीच्या अंतरावर असलेल्या या धरणात मुबलक स्वरूपात पाणी आहे. पाण्याचा पाट जेथपर्यंत आहे तेथपर्यंत गळती लागली असल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन ओलीताखाली राहत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या धरणाच्या मुख्य उद्देश साध्य झाला नसून फायदा कमी व तोटाच जास्त झाला आहे. अजूनपर्यंत या पाटाचे काम पूर्ण झाले नसल्याने शेवटच्या पाड्यापर्यंत पाणी पोहचले नसून पर्यायी मोठे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ मात्र कायम आहे.
या धरणासाठी करोडोंचा खर्च झाला असून आजही दुरूस्तीच्या नावाखाली तो सुरूच आहे. परंतु या धरणाचे कामकाज सुरळीत झाले असते तर नक्कीच मोखाडावासीयांचा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत झाली असती परंतु या शासनाच्या हलगर्जीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षीत कारभारामुळे या
वाघ प्रकल्पाचा फायदा कमी तोटाच जास्त झाला आहे.
(वार्ताहर)