लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
By Admin | Updated: September 3, 2015 23:09 IST2015-09-03T23:09:41+5:302015-09-03T23:09:41+5:30
सरकारी वसतिगृहातील १३७ विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाची प्रशासनाने चौथ्या दिवशी (गुरुवारी) दखल घेऊन मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले

लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
वाडा : सरकारी वसतिगृहातील १३७ विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाची प्रशासनाने चौथ्या दिवशी (गुरुवारी) दखल घेऊन मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले. सोमवार (दि. ३१) पासून विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले होते.
काही महिन्यांपूर्वी पेण येथील विद्यार्थ्यांनी किमान सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून आंदोलन केले होते. त्या वेळी तोडफोड झाल्याने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. या मागणीवर शासनदरबारी चर्चा सुरू असून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणक, प्रशिक्षण, व्यायाम, क्रीडा साहित्य, गं्रथालय, शिष्यवृत्ती, जनरेटर, पाण्याचा प्रश्न या सुविधा तत्काळ पुरविण्यात येतील, असे लेखी आश्वासन प्रकल्प अधिकारी लोमेश सहाणे यांनी दिले.