आश्वासनानंतर आंदोलन मागे
By Admin | Updated: January 9, 2016 01:54 IST2016-01-09T01:54:31+5:302016-01-09T01:54:31+5:30
येथील गारगाई नदीवरील पूल कोसळून दोन वर्षे झाली तरी त्याकडे काणाडोळा करणाऱ्या लालफितीच्या कारभाराला श्रमजीवी संघटनेने आंदोलनाद्वारे

आश्वासनानंतर आंदोलन मागे
वाडा : येथील गारगाई नदीवरील पूल कोसळून दोन वर्षे झाली तरी त्याकडे काणाडोळा करणाऱ्या लालफितीच्या कारभाराला श्रमजीवी संघटनेने आंदोलनाद्वारे धडक दिल्यानंतर बांधकाम खात्याला जाग आली असून प्रशासनाने शुक्रवारपासून पुलाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
गारगाव पूल दोन वर्षांपूर्वी अवघड वाहन गेल्याने कोसळला होता. पूल तुटल्यानंतर गारगाव, दाभोण, मांगरूळ, पिंजाळ, फणसपाडा यासारख्या १२ गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना लांब फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. दोन वर्षांचा एवढा प्रदीर्घ कालावधी लोटला असतानासुद्धा पुलाचे बांधकाम सुरू होत नाही. त्यामुळे संतापलेल्या श्रमजीवी संघटनेक डून येथील विद्यार्थी, ग्रामस्थ व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन बुधवारी (दि. ६) तुटलेल्या पुलाजवळ आंदोलन सुरू केले होते. अखेर, लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.