शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वेहेलपाड्यातील जगदंबेच्या बोहाड्यास प्रारंभ

By admin | Updated: March 19, 2017 05:30 IST

विक्रमगड पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथे आदिवासींच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सव

- राहुल वाडेकरे,  विक्रमगडविक्रमगड पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथे आदिवासींच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सव रंगपंचमीच्या दिवशी मोठया उत्साहात व भक्तीभावाने सुरू झाला. यावेळी आजूबाजूच्या गावपाडयातील मिळून दहा हजार ते पंधरा हजार भाविकांचा त्यात सहभाग होता़ पहाटेपर्यत विविध देवदेवतांची ५६ सोंगे नाचविण्यांत आल्याचे येथील उत्सव मंडळाकडून व पोलिस पाटील रमेश वारंगडे यांनी लोकमतला सांगीतले़ तहसिलदार सुरेश सोनवणे, पोलिस निरिक्षक विजय शिंदे, कृषि अधिकारी दिलीप ढेंबरे, वनक्षेपाल मुठे, राजेंद्र भानुशाली,योगेश भानुशाली,अनिल भानुशाली,पत्रकार आदींसह गावचे सरपंच सीता केंझरा, उपसरपंच कृष्णा वारंगडे, मनोज चौधरी आदिंसह प्रतिष्ठीत व्यक्तींनीही भेट दिली़ त्यांचे यावेळी मंडळाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यांत आले़ आदिवासी समाजात लोककलेला फार महत्व आहे़ पारंपारिक नृत्यकला त्यांच्याकडे आहेत़ तसेच अनेक बोलीभाषाही आहेत़ त्या संस्कृतीमधील बोहाडा पाहण्यासाठी असंख्य भक्तांनी दाटी केली होती. यावेळी अनेक दुकानदारांनी वेगवेगळया वस्तूंचे स्टॉल लावलेले होते. मिठाई व विविध वस्तू खरेदीवरही नागरिकांचा मोठा भर होता़ गेल्या १०० वर्षाच्यापंरपरेनुसार दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी वेहेलपाडा(विठ्ठलनगर)येथे बोहाडा साजरा केला जातो़ या यात्रोत्सवात १५ मार्च रोजी थाप (लहान बोहाडा) १६ मार्च रोजी लहान(दुसरी थाप) बोहाडा साजरा करण्यांत आला तर १७ मार्च रोजी मोठा बोहाडा असा उत्सव रात्री ८ पासून ते सकाळी ८ पर्यत मोठया भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यांत आला़ या दिवशी या परिसराला मोठ्या जत्रेचे स्वरुप प्राप्त होते व ते पहाटेपर्यंत राहाते़ या याÞत्रोत्सवात रामायण, महाभारत आदी पौराणिक ग्रंथातील देव-देवतांची निवड करुन आदिवासी बांधव घरच्या घरी लाकूड, चिकणमाती यापासून देवतांचे आकर्षक मुखवटे तयार करुन ते चेहऱ्यावर चढवतात व त्यांना साजेशी वेषभूषा करून परंपरेनुसार मशालीच्या उजेडात आणि तालबध्द वाजंत्रीच्या तालावर रात्री आठ ते सकाळी आठ या काळात नाचवितात. प्रारंभी गजाननाला वंदन करुन त्यांचे सोंग (मुखवटा) नाचविला जातो़ त्यानंतर सरस्वती विष्णू आणि पुराणातील युध्दांचे प्रसंग सोंगे नाचवून भक्तिभावाने सादर केले जातात़ या वातावरणात आदिवासी अगदी तल्लीन होतात. ़विविध सोंगे नाचवून प्रसंगांच्या सादरीकरणातच पहाट होते़ त्यानंतर गावातील मूळ ग्रामदेवता जगदंबा मातेची विधीवत पूजा करुन व महिषासूर व देवी यातील युद्ध सोंगांच्या माध्यमातून सादर केले जाते़ गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणून आदिवासी हा बोहाडा म्हणजेच जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात़ ग्रामदेवी नवसाला पावते अशी येथील आदिवासींंची श्रध्दा असून यावेळी केलेले नवस फेडण्यासाठी व नविन नवस बोलण्यासाठी भक्त गर्दी करीत होते. या यात्रोत्सवात आदिसींबरोबरच इतरही जातीधर्माच्या भाविकांनी सहभागी होऊन या यात्रोत्सवाचा आनंद मनमुराद लुटला़