भिकारणींनी चोरले ५ लाखांचे दागिने

By Admin | Updated: June 30, 2017 02:35 IST2017-06-30T02:35:58+5:302017-06-30T02:35:58+5:30

आपल्या मुलासंह भीक मागण्याच्या निमित्ताने ज्वेलर्सच्या दुकानात घुसून पाच लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना नायगाव

The beggar stole five lakh jewelery | भिकारणींनी चोरले ५ लाखांचे दागिने

भिकारणींनी चोरले ५ लाखांचे दागिने

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : आपल्या मुलासंह भीक मागण्याच्या निमित्ताने ज्वेलर्सच्या दुकानात घुसून पाच लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना नायगाव परिसरात घडली असून या चोरट्यांचे प्रताप सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्या आधारे माणिकपूर पोलीस चोरट्या महिलांचा मागोवा घेत आहेत.
ही घटना गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास नायगाव पश्चिमेकडील गणेश ज्वेलर्सच्या दुकानात घडली. सहा महिला कडेवर मुले घेऊन दुकानात भीक मागण्याच्या बहाण्याने शिरल्या. त्यातील काही महिलांनी मालक आणि नोकराला गुंतवून ठेवले. तर त्यांच्या साथिदारांनी पाच लाख रुपये किंमतीच्या दागिन्यानी भरलेली पिशवी लंपास केली. त्यानंतर सहाही महिला दुकानातून निघून गेल्या.
आपली दागिन्यांची पिशवी गायब झाल्याचे दुकान मालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता सहा महिलांनी दागिने चोरल्याचे उजेडात आले.
याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्या महिलांचे फोटो सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाले आहेत. त्याआधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: The beggar stole five lakh jewelery