शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तब्बल 16 तास वादळवाऱ्यात समुद्राशी दिली झुंज; फेसाळत्या लाटांशी दोन हात केलेल्या सावळारामने सांगितला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:03 IST

...अखेर सातपाटी येथील एका मच्छीमार बोटीतील मच्छीमारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला बोटीत घेतले. हा थरार कथन केला आहे सावळाराम पाटील (४२) या तरुणाने. आणखी १० तास पोहू शकलो असतो, असेही सावळाराम म्हणाला. यावरूनच मच्छीमाराला ‘दर्याचा राजा’ का म्हणतात, याची प्रचिती आली. 

हितेन नाईक -

पालघर : एडवण येथील ‘वैष्णवदेवी’ या बोटीतून शनिवारी रात्री पाय घसरून अचानक पाय घसरून पडतो. कुणालाच मी समुद्रात पडल्याचा अंदाज आला नाही आणि बोट पुढे निघून गेली. चोहोबाजूला पाणीच पाणी... मिट्ट अंधारात तब्बल १६ तासा पोहोत राहिलो, पण जिद्द सोडली नाही.  रात्र सरली... सूर्य उगवताना दिसला आणि पुन्हा नव्या उमेदीने उगवत्या सूर्याच्या दिशेने पोहायला सुरुवात केली... अखेर सातपाटी येथील एका मच्छीमार बोटीतील मच्छीमारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला बोटीत घेतले. हा थरार कथन केला आहे सावळाराम पाटील (४२) या तरुणाने. आणखी १० तास पोहू शकलो असतो, असेही सावळाराम म्हणाला. यावरूनच मच्छीमाराला ‘दर्याचा राजा’ का म्हणतात, याची प्रचिती आली. 

पालघर तालुक्यातील एडवन येथील दीपेश तरे यांची ‘वैष्णवदेवी’ ही बोट बंदरातून शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता मासेमारीसाठी रवाना झाली. अरबी समुद्रात २३ नाॅटिकाल समुद्री क्षेत्रात असलेल्या आपल्या कविवर जाळे लावण्यासाठी हे निघाले असताना मधल्या काळात त्यांनी जेवण उरकले.

रात्री जाळे मांडायचे असल्याने बोटीचा तांडेल बोट चालवीत असल्याने सर्व जण झोपी गेले. अनेक तासांच्या प्रवासानंतर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी काही वेळ बाकी असताना तांडेल यांनी सर्वांना उठवले आणि जाळे मांडण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या. 

यावेळी सर्व उठून तयारी करीत असताना सावळाराम दिसत नसल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. समुद्रात मोठमोठ्यांनी हाका मारल्यानंतरही त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तो कुठेच आढळून न आल्याने तो समुद्रात पडल्याची खात्री पटली आणि बोट त्याच मार्गाने त्याच्या शोधार्थ माघारी फिरविण्यात आली.

पोलिस आणि कोस्ट गार्डची धडपडअनेक तासांच्या प्रयत्नानंतरही तो सापडला नसल्याने बोटीत कोस्ट गार्डकडून देण्यात आलेल्या दिस्ट्रस अलर्ट सिस्टम या आपत्कालीन मशीनचे ४ नंबरचे बटण दीपेश तरे यांनी दाबून मदत मागितली. मात्र, मदत उपलब्ध न झाल्याने शेवटी केळवे पोलिसांशी संपर्क साधल्यावर सपोनि भीमसेन गायकवाड यांनी कोस्ट गार्डशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मदत उपलब्ध करून देण्यात आली, परंतु शोध लागला नाही. केळवे पोलिसांनी सर्व बोटींशी संपर्क साधल्यावर ‘योग दत्त’ बोटीतील मच्छीमारांना सावळाराम पोहत असल्याचे दिसून आले. त्याला बोटीत घेतल्यावर ‘वैष्णव देवी’ या त्यांच्या बोटीशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारpalgharपालघर