सिमेवरील आदिवासींना गुजरात राज्याचा आधार

By Admin | Updated: February 4, 2017 02:46 IST2017-02-04T02:46:52+5:302017-02-04T02:46:52+5:30

जव्हार तालुक्यातील व गुजरात व दादरा- नगरहवेली या सिमेवरील अनेक आदिवासी गाव-पाड्याना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. यामध्ये सीमे लागत असलेले

The base of the Gujarat state on tribal people | सिमेवरील आदिवासींना गुजरात राज्याचा आधार

सिमेवरील आदिवासींना गुजरात राज्याचा आधार

- हुसेन मेमन,  जव्हार
जव्हार तालुक्यातील व गुजरात व दादरा- नगरहवेली या सिमेवरील अनेक आदिवासी गाव-पाड्याना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. यामध्ये सीमे लागत असलेले रु ईघर, बोपदरी, दाभेरी, पाचबुड, सागपाणा, सरोळीपाडा, रिठीपाडा, हे शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेले गाव-पाडे आहेत. शासनाच्या उदासिनतेमुळे या गावपाड्यांमध्ये अद्यापर्यंत चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणी, वीज अशा मुलभूत सोयी सुविधा पोहचलेल्या नसून शिक्षण आणि आरोग्य अशा गरजांसाठी त्यांना गुजरात राज्याचा आधार घ्यावा लागतो.
या गावपाड्यांपैकी सरोळीपाडा, रिठीपाडा, पाचबुड या पाड्यांना वीज पोहचले नाही. या पाड्यांची विद्युतीकरन जोडणीला शासनाकडून मंजुरी मिळून पाच वर्ष झाली आहेत. मात्र, अजूनही या पाड्यातील विद्यूत जोडणी करण्यात आलेली नाही. येथील आदिवासींना आजही अंधारात चाचपडत जीवन जगावे लागत आहे. या पाड्यांना विद्यूत जोडणी नसल्याने, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना रात्रीच्या वेळी दिवा बत्तीचा आधार घेऊन अभ्यास करावा लागत आहे.
सागपणा, रिठीपाडा, पाचबुड, या पाड्यांतील नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा जानवू लागतात. दरवर्षी येथील आदिवासींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. टँकरची मागणी केल्या नंतर शासनाकडून मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवसाआड टँकर येत असल्याचे येथील गावकरी सांगतात. गेल्या अनेक वर्षा पासून येथील नागरिकांची पाईप लाईने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आहे.

Web Title: The base of the Gujarat state on tribal people