Baroda highway land acquisition rate still in the dark | बडोदा हाय वे भूसंपादनाचा दर अजूनही अंधारातच
बडोदा हाय वे भूसंपादनाचा दर अजूनही अंधारातच

- सुनील घरत 
पारोळ : नियोजीत मुंबई बडोदा महामार्गात जाणाऱ्या संपादित जमीनीचे दर वसई प्रांताधिकारी जाहीर न करता फक्त तारीख पे तारीख देत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई बडोदा महामार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या वसई तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनींचा नेमका मोबदला किती मिळणार याबाबत आजही शेतकरी संभ्रमित असून यासाठी वसई प्रांताधिकाºयांना अनेकदा निवेदने देऊनही दर जाहीर होत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच मोबदला दराबाबत शेतकºयांना जाणून बुजून शासनामार्फत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप करून आयुष्याची मिळकत मुकणार असल्याने त्या बदल्यात योग्य असा मोबदला द्यावा, अशी मागणी जमिनी जाणाºया बाधित शेतकºयांनी केली असून शेतकरी आंदोलन नाच्या तयारीत आहेत.
केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजित विकास आराखड्यामध्ये वसई पूर्व भागातील कशीद-कोपर, मांडवी, चांदीप, नवसई, भाताणे, भिनार, आडणे, आंबोडे आदी गावातील अधिग्रहित होणाºया सुपीक जमिनींवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे. मात्र असे असताना अधिग्रहित जमिनींचा मोबदला किती हे अजूनही स्पष्ट होत नसल्याने मार्ग बाधित शेतकरी चिंतेत पडले आहेत . याबाबत तातडीने घोषणा न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा त्यांनी दिला आहे.
>देशाच्या विकास कामाकरता आपल्या पिढ्यान्पिढ्यांची मिळकत द्यावी लागणार आहे. हे माहित झालेल्या बाधितांना तिचा मोबदला किती मिळणार हे मात्र शासन अजूनही जाहीर करीत नसून या महामार्गासाठीचा निधी न आल्याचे प्रांताधिकाºयांचे म्हणणे आहे. - वसंत पाटील,
शेतकरी, भिनार


Web Title: Baroda highway land acquisition rate still in the dark
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.