शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

बाप्पा आले अन निघालेही...

By admin | Updated: September 7, 2016 02:32 IST

‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’ म्हणत डहाणूतील गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींवर बाप्पांचे स्वागत केले.

डहाणू/बोर्डी : ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’ म्हणत डहाणूतील गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींवर बाप्पांचे स्वागत केले. विधिवत पूजनाने घरगुती व सार्वजनिक गणेशमुतींची प्राणप्रतिष्ठा करण्यातआली होती. दिवसभर गणेशोत्सवाच्या सहवासात रंगलेल्या भक्तांनी दर्शनाकरीता रांगा लावल्या होत्या. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि महावितरणच्या सहकार्याने भक्तांनी उत्सवाचा आनंद लुटला. दीड दिवसांच्या विसर्जनकरीता समुद्रकिनारी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. डहाणू फोर्ट येथील कार्यशाळेतून वाजतगाजत गणरायाचे आगमन करण्यात आले. सोमवार, ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी, नवसाचे, मानाचे घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रतिवर्षी गणेशमुर्तींची वाढती संख्या लक्षात घेता पूजाविधी आटोपताना पुजाऱ्यांची लगबग दिसून आली. फुलं, विद्युत रोषणाई मंडप सजविण्यात आले होते. अष्टविनायक, जलसंवर्धन, भ्रष्टाचार, पर्यावरण संरक्षण इ. देखावे व चलचित्रांद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले होते. प्रसादाची तयारी व मोदकांची सज्जता करण्यात आली होती. नारळ, डाळींद्वारे उकडीचे मोदक बनवण्याची कला नव्या पिढीकडे संक्रमित करण्याचा कल बुजुर्ग महिलांमध्ये दिसला. रात्रभर जागरण करून भजन-कीर्तनाचे कार्यक्र म रंगले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेनंतर दीडिदवसांच्या गणेशमूर्तींच्या कार्यक्र माला ढोल, ताशा आणि डिजेच्या तालावर प्रारंभ झाला. मिरवणुकी दरम्यान चिखले समुद्रकाष्ठ मित्र मंडळ आणि समाजसेवक महादेव सावे यांनी संयुक्तरित्या पेयजल व सरबताचे वाटप करण्यात आले. घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत २१६ घरगुती आणि १०८ सार्वजनिक गणेश मूर्ती बसविण्यात आल्या. त्यापैकी अनुक्रमे १५९ व ३२ दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाकरिता आठ होमगार्ड, पस्तीस पोलीस कर्मचारी, सागररक्षक दल, स्थानिक आदींच्या मदतीने सुरक्षात्मक उपाययोजल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी माहिती दिली. विसर्जनाकरिता मोठा समुदाय किनाऱ्यांवर जमला होता. या करिता डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील वाहतूक नियोजन करण्यात आले होते. जांबुगाव या आदिवासी गावात एक गाव, एक गणपती ही उल्लेखनीय पद्धत पहावयास मिळाली. वसईत एकूण २५ हजार ९७६ सार्वजिनक आणि घरगुती गणेशाचे आगमन झाले आहे. यामध्ये घरगुती २४ हजार ९५६ आणि सार्वजनिक ८१८ गणराांची संख्या आहे. ंयदा तब्बल अठराशेहून अधिक गणरायांच संख्या वाढल्याचे दिसून आले. भाविक रांगा लावून उभे असल्याचे पहावास मिळाले.चैन पडेना आम्हालापालघर/वसई : पालघर जिल्ह्याच्या सागरी, डोंगरी आणि शहरी भागामध्ये सोमवारी परंपरेप्रमाणे प्राणप्रतिष्ठीत झालेल्यांपैकी दीड दिवसांच्या गणपती बाप्पानीं आज मंगळवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह ेगुलालच्या उधळणीने सर्व परिसर दणाणून गेला होता. बाप्पाच्या जाण्याने अनेक गणेशभक्तांना आपले आश्रू आवरता आले नाही. स्थापने पासून घरोघरी मोठी लगबग सुरु होती. कुठे गोडधोड पदार्थ तर कुठे आरासाला फायनल टच देण्याची बच्चे कंपनीची तयारी. मात्र, झिम्मा फुगडीची सलामी घेऊन दीड दिवसांच्या गणरायांनी निरोपाची तयारी करताच भक्तांचें मन भरून आले होते. पालघर जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत २३ पोलीस स्टेशन मध्ये २ हजार ७३४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर ३२ हजार २५५ खाजगी रित्या गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे. तर एक गाव एक गणपती उत्सव १५८ गावे साजरी करीत आहेत.या उत्सवा सह मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण ही उत्साहाने साजरा होऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षका अंतर्गत ९६६ अधिकारी कर्मचारी, होमगार्ड, व दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, वसई, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह ११ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणार्या बकरी ईद सणा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांच्या मार्गदर्शना खाली दोन अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १२३ पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, ८३६ पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड,दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून, शिग्र कृती दलाचे दोन प्लाटून, राखीव पोलीस दलाचे एक प्लाटून इतका बंदोबस्त जिल्ह्यात ठेवण्यात आला आहे. पालघर उपविभागा अंतर्गत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मनोरमध्ये दिड दिवासांच्या १४६ बाप्पांचे विसर्जनमनोर : सोमवारी मोठ्या भक्तीभावाने आगमण झालेल्या दिड दिवसांच्या तब्बल १४६ बाप्पाचे मंगळवारी विसर्जन झाले. लाडक्या गणरायाला कालपासून भजन , किर्तन, फुगड्या, झिम्मा घालुन जागविणाऱ्या हजारो भक्तांच्या डोळ्याच्या कडा बाप्पा विसर्जित होत असतांना ओल्या झाल्या. चैन पडेना आम्हाला म्हणत अलविदा करण्यात आला. विसर्जनासाठी मनोर गाव ते वैतरना कुंडापर्यंत मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात, गुलाल उधळत बाप्पाची मिरवणूकी द्वारे स्वारी काढण्यात आली होती. कुणी डोक्यावर तर कुणी हातगाडीवर बाप्पाला विराजमान केले होते. अनेकांनी चार चाकी वाहनावर मूर्ती ठेवली होती. टेण, नांदगाव, मासवन, दुर्वेस, हलोली, कुडे, दहिसरसह अन्य गावपड्यात ही विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. ३४ सार्वजनिक ११२ घरगुती बाप्पांचे वैतरणा, देहर्जा, हतनदी, सूर्या व तानसा नदीत बाप्पाचे भावपुर्ण विसर्जन करण्यात आले.