बँकांत झुंबड, एटीएम बंद, पहाटेपासूनच रांगा!
By Admin | Updated: November 11, 2016 02:52 IST2016-11-11T02:52:42+5:302016-11-11T02:52:42+5:30
नव्या नोटा घेण्यासाठी वसई विरार परिसरातील बँकांपुढे सकाळपासूनच लोक रांगा लागल्या होत्या. चार हजार रुपयांच्या नव्या नोटा हातात पडल्यानंतर नागरिक आनंदाने जाताना दिसत होेते

बँकांत झुंबड, एटीएम बंद, पहाटेपासूनच रांगा!
वसई : नव्या नोटा घेण्यासाठी वसई विरार परिसरातील बँकांपुढे सकाळपासूनच लोक रांगा लागल्या होत्या. चार हजार रुपयांच्या नव्या नोटा हातात पडल्यानंतर नागरिक आनंदाने जाताना दिसत होेते. मात्र, वसई विरार परिसरातील दुकाने आजही ओस पडली होती. बहुतेक सोनारांनी दुकाने बंद ठेवली होती. पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पीटल्समध्ये जुन्या नोटा नाकारून लोकांची अडवणूक केली जात होती. तर हॉटेल व्यावसायिक जुन्या नोटा घेत नसल्याने खवय्यंनी पाठ फिरवली होती.
नव्या नोटा घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी बँकांपुढे लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. अगदी सकाळपासूनच ते थेट बँका बंद होईपर्यंत लोकांच्या रांगा दिसत होत्या. नव्या नोटांसह सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरता येत नव्हता. बँकांपुढे मोठ्या रांगा असल्या तरी सर्व व्यवहार अगदी शांततेत पार पडले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी गस्त घालीत बँकांच्या परिसरात नजर ठेवली होती.
फक्त चार हजार रुपये हातात पडत असल्याने ते अत्यंत जपून खर्च करण्याची मानसिकता असल्याने बाजारात शुकशुकाट होता. व्यवहार ठप्प झाले होेते. बाजारपेठा आणि दुकाने ओस पडली होती. एखाद दुसरा अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिक जुन्या नोटा घेत नसल्याने हॉटेलेही ओस पडली होती. बहुतेक सोनारांनी दुकाने बंद ठेवली होती. सरकारने पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पीटल्सना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असले तरी वसई विरार परिसरात या आदेशाची सर्रासपणे पायमल्ली केली गेली. पेट्रोल पंपावर जुन्या नोटा घेतल्या जात नव्हत. डोकेदुखी नको म्हणून अनेक मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आली होती. बहुतेक मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पीटल्समध्ये जुन्या नोटा घेतल जात नसल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. (प्रतिनिधी)