चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेला बजाज अॅवॉर्ड
By Admin | Updated: April 20, 2017 23:58 IST2017-04-20T23:58:02+5:302017-04-20T23:58:02+5:30
कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्टीसेस (सी.एफ.बी.पी.) या संस्थेतर्फे फेअर

चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेला बजाज अॅवॉर्ड
डहाणू : कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्टीसेस (सी.एफ.बी.पी.) या संस्थेतर्फे फेअर बिझिनेस प्रॅक्टीसेससाठी जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कार चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते तो संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ व सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ यांनी स्वीकारला. हा सोहळा चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेम्बर्सच्या वालचंद हिराचंद सभागृहात पार पडला. या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, बजाज इलेक्ट्रिकलचे अध्यक्ष शेखर बजाज, सी. एफ. बी. पी.च्या अध्यक्षा कल्पना मुन्शी, विनीत भटनागर, स्वप्निल कोठारी इ. मान्यवर उपस्थित होते.
सुरेश प्रभू म्हणाले की, महात्मा गांधीच्या विचाराप्रमाणे व्यावसायिकांनी व्यवसायाचे विश्वस्त बनून काम करावे जेणेकरून व्यावसायिक व समाज दोन्ही घटक समाधानी राहतील तसेच जमनालाल बजाज यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्याचे आहे. या पुरस्कारामुळे तुमच्यावरील जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट म्हणाले की, चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर पुरस्कारांच्या रूपाने कौतुकाची थाप पडणे आवश्यक असते. चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी या संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो. या वेळी या संस्थेबरोबर अपना बाजार, जे. एस . डब्ल्यु , आयडीबीआय बँक , जे.एम. फायनॅन्शियल इन्स्टिट्यूट यांना ही पुरस्कार देण्यात आले या पुरस्कार विजेत्यांची निवड न्या.श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली .
या कार्यक्रमास चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे सचिव महेंद्र चुरी, अश्विन पारेख, सल्लागार डॉ. रामदास गुजराथी, महेश पाटील प्राचार्य डॉ. प्रमिला राऊत , दर्शन श्रॉफ , ईशीता श्रॉफ , नारायण केळकर, प्रा. जनार्दन शिंदे, सरपंच सुरेंद्र करवीर शशिकांत राऊत प्रा. संजय घरत आय. यु. शेख आदी संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)