मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

By धीरज परब | Updated: April 9, 2024 19:10 IST2024-04-09T19:10:24+5:302024-04-09T19:10:42+5:30

मावसाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर ती कांदिवली भागात रहायला गेली. पीडिता सध्या १९ वर्षांची आहे. 

Aunt rapes minor niece in mira road | मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

मीरारोड: मावशीकडे राहणाऱ्या अनाथ अल्पवयीन मुलीवर मावश्याने अनेकदा बलात्कार केल्याचा गुन्हा काशीगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पीडित मुलगी हि अल्पवयीन असताना काशीमीरा भाजी मार्केट मार्गावरील एकता चाळीत मावशी - व मावसा शंकर नाथ यांच्या घरी जुलै २०२१ ते मार्च २०२४ ह्याकाळात रहात होती. मावशी हि गावी गेली असता मावसा शंकर नाथ याने तिच्या अनाथ व एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने सतत बलात्कार केले. मावसाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर ती कांदिवली भागात रहायला गेली. पीडिता सध्या १९ वर्षांची आहे. 

तिने तिच्या वरील अत्याचारा बद्दल चारकोप पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो काशीगाव पोलिसां कडे हस्तांतरित केला आहे. ८ एप्रिल रोजी शंकर नाथ याच्यावर बलात्कार , पॉक्सो आदी नुसार गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी  तपास सुरु केला आहे . 

Web Title: Aunt rapes minor niece in mira road