दोन अट्टल घरफोडे अटकेत
By Admin | Updated: July 7, 2017 05:58 IST2017-07-07T05:58:27+5:302017-07-07T05:58:27+5:30
नालासोपारा परिसरात घरफोड्ी करणाऱ्या टोळीतील दोन अट्टल चोरट़्यांना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून

दोन अट्टल घरफोडे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार: नालासोपारा परिसरात घरफोड्ी करणाऱ्या टोळीतील दोन अट्टल चोरट़्यांना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून त्यांनी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या टोळीतील एका गुन्हेगाराचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग सुरु केली आहे. या पथकाने काल रात्री बाबू यादव (२५) आणि मोंटू चौधरी (२७) या दोघांना ताब्यात घेतले. चाकशीत ते घरफोडे असल्याचे निष्पन्न झाले. बाबू आणि मोंटू यांनी साथीदार जितू पाटील याच्यासोबत सहा महिन्यात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली
आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेतीन लाखाचा ऐवजही हस्तगत केला.