दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत
By Admin | Updated: December 23, 2014 01:39 IST2014-12-23T01:39:22+5:302014-12-23T01:39:56+5:30
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेडुंग फाटा येथे शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत
नवी मुंबई : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेडुंग फाटा येथे शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई - पुणे जुन्या मार्गावर शेडुंग फाटा येथील अमोल पेट्रोल पंपावर दरोडा पडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नवीन पनवेल पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचला होता. यावेळी काही तरुण तेथे संशयास्पद वावरताना पोलिसांना आढळले. त्यांना ताब्यात घेतले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार चौघांनाही अटक करण्यात आली आहे. मन्नू भोसले (२६), दीपक पवार (३०), देवराज पवार (२४) आणि राजू राठोड (२२) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)