अरुण कदम शिवसेनेत

By Admin | Updated: April 14, 2017 03:02 IST2017-04-14T03:02:31+5:302017-04-14T03:02:31+5:30

मनसेचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्या प्रवेशाने पालघर जिल्ह्यात मनसेला मोठा फटका बसला आहे.

Arun Kadam Shivsenaet | अरुण कदम शिवसेनेत

अरुण कदम शिवसेनेत

वसई : मनसेचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्या प्रवेशाने पालघर जिल्ह्यात मनसेला मोठा फटका बसला आहे.
मीरा-भाईंदरचे माजी नगरसेवक असलेल्या अरुण कदम यांच्याकडे मनसेचे उपाध्यक्ष आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद होते. पालघर जिल्ह्यात मनसेला बळकटी देण्याचे काम कदम यांनी केले होते. मात्र, मनसेच्या नेत्यांना पक्ष वाढीत रस नाही. संघटनेच्या कामाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी राजकीय हानी होत असल्याचे आरोप करत त्यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. कदम यांच्या जाण्याने मनसेला पालघर जिल्ह्यात आता कुणीच वाली न उरल्याने मोठा झटका बसला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arun Kadam Shivsenaet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.