शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

किमयागाराला कलात्मक श्रद्धांजली, आर्टिस्टने चितारला अटलजींचा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 15:44 IST

भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी - भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने अटलजींचे टॅटू चितारून, कलेच्या माध्यमातून आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. तालुक्याच्या राई गावातील टॅटू आर्टिस्ट दिलीप पटेल यांनी हार्दिक कडू या 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणांच्या पाठीवर हा टॅटू गोंदवला आहे. 

भारताच्या तिरंग्यावर आर्टीस्ट दिलीप यांनी अटलजींची प्रतिकृती चितारली आहे. त्यांच्या कुंचल्यातून चेहऱ्यावरील भाव इतके प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत, कि त्यामुळे ही कलाकृती बोलकी वाटते. हा टॅटू काढण्याकरिता त्याला चार तासांचा अवधी लागला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता टॅटूला प्रारंभ करण्यात आला, दुपारी एकच्या सुमारास ही कलाकृती पूर्णत्वास आली. एकूण टॅटूची लांबी 16 बाय दहा इंच असून 7 बाय 5 इंच चेहऱ्याची प्रतिमा आहे. याकरिता ऍक्रोलीक इकोफ्रेंडली रंग वापरण्यात आले आहेत. स्वर्गीय माजी पंतप्रधानांविषयी शालेय वयात जे ऐकले,  त्या जाणिवेतून तब्बल चारतास एका जागी न हलता बसता आले, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे 16 वर्षीय हार्दिक कडू याने लोकमतशी बोलताना सांगितले. तर विज्ञाननिष्ठ आणि देशप्रेमी अटलजींना आपल्या कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा विचार त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मनात आला. त्यानंतरच हे टॅटू आकाराला आल्याचे आर्टिस्ट दिलीप पटेल यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ -

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीartकला