सोने घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक करा, अन्यथा आत्मदहन
By Admin | Updated: February 3, 2017 02:14 IST2017-02-03T02:14:46+5:302017-02-03T02:14:46+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ या महिन्यात उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाचा सूत्रधार हेमंत उदावंत व त्याच्या

सोने घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक करा, अन्यथा आत्मदहन
- रविंद्र साळवे, मोखाडा
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ या महिन्यात उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाचा सूत्रधार हेमंत उदावंत व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी व गोवल्या गेलेल्या सर्व आरोपींची मुक्तता करावी अन्यथा सहकुटुंब आत्मदहन करू असा इशारा याप्रकरणी तुरुंगात असलेल्या वसिम याच्या वडिलांनी पोलिसांना दिला आहे.
मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षातच करोडपती झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप श्रीमंतीचे बिंग फुटले व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील त्याचे बनावट सोने तारण कर्जाचे प्रकरण उघडकीस आले. या कर्जामध्ये हेमंत उदावंत याने आपली पत्नी, बँक शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा सोनेमूल्यमापक चंद्रकांत बागूल, वॉचमन, उदावंत याच्या वाहनाचा चालक वसिम मनियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास २ कोटी ७३ लाखांचे बनावट सोने तारण ठेऊन कर्जाची उचल केली. तपासणीत हे सोने बनावट निघाले. त्यामुळे १७ कर्जदारांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यापासून कारागृहात असलेला वसिम मनियार त्याची पत्नी, दोन मुले व वडिल यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्य आरोपीस व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी व नाहक या प्रकरणात गोवलेल्या सर्व आरोपीना सोडावे. अशी त्यांची मागणी आहे.
- या घोटाळ्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे इतरावर कारवाई करु नये असे २६ फेब्रुवारी २०१६ रोजी बँक शाखा व्यवस्थापकांच्या समोर २०० रु पयांच्या स्टँम्प पेपरवर हेमंत उदावंत याने लिहून दिले. तरीही या प्रकरणात गोवण्यात आलेल्या १६ पैकी १४ आरोपीना नाहक कारागृहाची हवा खावी लागते आहे.