शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एरिया श्वानांचा असतो : संपूर्ण जंगल हे वाघाचे असते; मुख्यमंत्र्यांची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:34 IST

इथले काही महाभाग म्हणतात की, मुख्यमंत्री कुणीही असो तो माझ्या खिशात असतो.

नालासोपारा : कोणत्याही परिस्थितीत वसई, विरारमधील हरितपट्टा कायम ठेवला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील प्रचारसभेत केली. काहीशा खवचटपणे ते म्हणाले, मी इकडे येत असतांना एकाने विचारले कुठे चालले आहात, मी सांगितले वसई विरारला सभा घ्यायला चाललो आहे. तेव्हा त्याने सांगितले वो एरिया तो किसी एक का है! तेव्हा त्याला मी सुनावले एरिया श्वान का होता है । और पुरा जंगल शेर का होता है। ये मेरा है ऐसा उसे बताना नही पडता.इथले काही महाभाग म्हणतात की, मुख्यमंत्री कुणीही असो तो माझ्या खिशात असतो. परंतु मी सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या साडेदहा कोटी जनतेचा मुख्यमंत्री ज्यात मावेल असा खिसा आजपर्यंत ना कधी तयार झाला ना यापुढे तयार होईल. मोगल, ब्रिटीश असे कितीक आलेत आणि गेलेत त्यांच्यापुढे अशा खिसेकऱ्यांची काय मातब्बरी समजावी. असा सवाल त्यांनी केला.या देशातल्या ज्या २० कोटी जनतेने आयुष्यात कधी बँक पाहिली नव्हती त्यांना बँकेची खाती मोदी सरकारने उघडून दिली. देशाच्या आर्थिक प्रवाहात आणले. ६० लाख शौचालये बांधलीत आणि हे राज्य हगणदारीमुक्त केले. यापूर्वी कोणताही सुशिक्षित तरूण अथवा तंत्रज्ञ बँकेमध्ये कर्ज मागायला गेला तर बँक म्हणायची हम आपके है कौन कारण त्याच्याकडे तारण नसायचे, भांडवल नसायचे. परंतु प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कोट्यवधी युवकांना स्वत:च्या पायावर उभे केले गेले.उपस्थित असलेल्या जनसमुदायाकडे पाहून ते म्हणाले २८ तारखेला विजय कुणाचा होणार आहे हे या जनसमुदायाने आजच सांगून टाकले आहे. ही निवडणूक गल्लीतली नाही दिल्लीतली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच राजेंद्र गावीतांना विजयी करा. १७०० कोटी रुपये खर्चून सूर्याचे पाणी या परिसराला देणारी योजना आपले सरकार राबवणार आहे. त्यामुळे भाजपाच्याच उमेदवाराला विजय करा, असे आवाहन त्यांनी केले.येथे काहीजण धमक्या देतात आमचीच शिट्टी वाजवा नाहीतर तुमची शिट्टी वाजवू. कुणी खंडणी वसूल करतात. परंतु अशा सगळ्यांना वठणीवर आणल्याशिवाय आपले सरकार राहणार नाही.अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस