शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात घेतली योग्यता चाचणी परीक्षा; मीरा-भाईंदर पालिकेकडे मागवला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 07:25 IST

आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या कामात एकीकडे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याचे सांगून नागरिकांच्या तक्रारींवर टोलवाटोलवी करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने ऐन निवडणुकीच्या काळात योग्यता चाचणी परीक्षा घेतली. त्यावर आयोगाने पालिकेकडे खुलासा मागवला असता पालिकेने मात्र आचारसंहितेचा भंग नसल्याचे कळवले आहे.

अभियंत्यांना निवडणूक कामी नेमण्यात आले आहे. निवडणुकीचे काम आणि कार्यालयीन काम असताना दुसरीकडे महापालिकेने या ४६ कनिष्ठ अभियंत्यांची योग्यता चाचणी परीक्षा २६ एप्रिल रोजी घेतली. वास्तविक निवडणुकीचे काम असल्याने चाचणी परीक्षा नंतर घ्यावी, अशी विनंती अभियंत्यांनी केली होती. इतकेच काय, ते अनेकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींनादेखील पत्र दिले होते. परीक्षेसाठी अभ्यास करण्याकरिता तसेच निवडणूक आणि पालिका कामातून वेळ मिळावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्रानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयुक्तांना २२ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये ॲटिट्यूड टेस्ट  ४ जूननंतर घ्यावी म्हणून कळवले. परंतु, पालिकेने त्या पत्राला न जुमानता परीक्षा घेतली. आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. 

महापालिकेने त्यांच्या अधिनस्त असलेल्या स्थायी वा अस्थायी कर्मचाऱ्यांची योग्यता चाचणी घेणे म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही. हा पालिकेच्या कामकाजाचा हा भाग आहे. त्यामुळे आयोगालादेखील याबाबतचा अहवाल दिला असून आचारसंहिता भंग झाला नसल्याचे कळवले आहे.- रवी पवार, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक