वसईतील विकासकामांना मंजुरी

By Admin | Updated: August 28, 2015 00:09 IST2015-08-28T00:09:15+5:302015-08-28T00:09:15+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १३८ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ निरनिराळ्या विषयांवर

Approval of development work in Vasai | वसईतील विकासकामांना मंजुरी

वसईतील विकासकामांना मंजुरी

वसई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १३८ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ निरनिराळ्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या वेळी वसई-विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांनी ग्रामीण भागातील विकासकामांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर केली. मुख्यमंत्र्यांनी ही विकासकामे मंजूर करीत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.
महापौर प्रवीणा ठाकूर यांनी नायगाव-भार्इंदर खाडीवरील सहापदरी पूल, अर्नाळा सुभाष लेन ते मुक्कामपाडा, अर्नाळा ते शीतलवाडी, रानवाडी ते लक्ष्मण रस्ता, अर्नाळा ते बेंडेवाडी, अर्नाळा पारनाका, जांभूळपाडा व ज्योती रस्ता अशा प्रलंबित विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले. या विकासकामांसाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या वेळी प्रवीणा ठाकूर यांनी मोनोरेल, अलिबाग मल्टीकॉरिडोअर, दहिसर-मीरा रोड-माणिकपूर-विरार मेट्रो रेल्वे, पश्चिम सागरी जोडरस्ता (सी-लिंक) या महत्त्वाच्या विकासकामांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच महापालिकेचा रिंगरूट प्रकल्पही प्राधिकरणामार्फत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर नारायण मानकर व प्रकाश वनमाळी आदी पदाधिकारी होते. या बैठकीत महापौर ठाकूर यांनी महापौर सहायता निधीत जमा झालेला ५ लाख ५ हजार ३३० रु.चा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीसाठी सुपूर्द केला. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of development work in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.