शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 05:04 IST

शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक

हितेन नाईक

पालघर : शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.गुजरातच्या दाहेज येथून नागोठणे येथे जाणारी गॅस पाईपलाइन पालघर जिल्हयातून जात असून २५ आॅगस्ट रोजी वाडा तालुक्यातील बिलोशी गावातून काही शेतकºयांच्या सुपीक जमिनी मधून जात असतांना तेथे उपस्थित शेतकºयांशी अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. त्यांनी शेतकरी मुनिराज गायकवाड ह्यांच्या श्रीमुखात लगावली आणि अन्य १२ शेतकºयां विरोधात सरकारी कामात अडथळा आणला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे गुन्हे दाखल केले. हे सर्व शेतकरी सध्या तुरु ंगात आहेत.

आज सेनेचे आ. रवींद्र फाटक, आ.अमित घोडा, सहसंपर्क प्रमुख श्रीनिवास वनगा, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, तालुकाध्यक्ष विकास मोरे, उपतालुका प्रमुख निलम संखे, जि.प. उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती ज्योती मेहेर, ज्योती ठाकरे आदींनी बाधित शेतकºयांच्या नातेवाईकांसह उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुने ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले.रिलायन्सच्या पाईपलाईनचे काम हे खाजगी असतांनाही जिल्हाधिकारी आणि पोलीस रिलायन्सचे नोकर असल्या प्रमाणे काम करीत असल्याचा आरोप आ. फाटक ह्यांनी केला. नुकसान भरपाई मध्ये विसंगती असून जो जास्त विरोध करतो त्याला जास्त भरपाई दिली जाते असे फाटक यांनी सांगितले.पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत ह्या साठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास सेनेच्या वतीने आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला.बिलोशी गावात पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे अनेक घरात चार दिवसांपासून चूलच पेटली नसून संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत असल्याचे अटक केलेल्या गायकवाड यांची पत्नी मनीषा गायकवाड ह्यांनी पत्रकारांना सांगितले. अटकसत्रा नंतर पोलीस बंदोबस्तात पाईपलाईन टाकण्याचे काम पोलिसांनी जबरदस्तीने पहाटेपर्यंत करून घेतल्याचा आरोप ह्यावेळी बाधित कुटुंबियानी केला. आम्हा दलित समाजाच्या १३ पैकी ११ लोकांवर अधीक्षक चव्हाण यांनी आकसाने कारवाई केली असून त्यांच्यावर आणि रिलायन्स पाईपलाईनचे काम करणारा दलाल आणि भाजप कार्यकर्ता योगेश पाटील यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा गायकवाड ह्यांनी केली आहे.रिलायन्स पाईपलाईन बाबत अनेक दलालांनी मोठी रक्कम घेतली असून ती एकित्रत रक्कम जमा करून ती बाधित शेतकर्यांना दिली असती तर शेतकर्यांनी स्वखुशीने आपल्या जमिनी रिलायन्सला दिल्या असत्या.- निलेश सांबरे,सामाजिक कार्यकर्ता, झडपोली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा