समितीच्या दौऱ्याने कुणाचे झाले भले?
By Admin | Updated: April 25, 2017 23:56 IST2017-04-25T23:56:40+5:302017-04-25T23:56:40+5:30
अठरा विश्व दारिद्रयाच्या काळोखात चाचपडणाऱ्या आदिवासी समाजाच्या व्यथा समस्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी व केलेल्या विकास कामांचा

समितीच्या दौऱ्याने कुणाचे झाले भले?
रवींद्र साळवे / मोखाडा
अठरा विश्व दारिद्रयाच्या काळोखात चाचपडणाऱ्या आदिवासी समाजाच्या व्यथा समस्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी व केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा पाहण्यासाठी महत्वपूर्ण समजला जाणारा अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा गुरुवारी पार पडला. पण त्याने कुणाचे काय, कसे व किती भले झाले हा प्रश्न मात्र निरुत्तरीतच राहिला.
समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे, पांडूरंग बरोरा, आनंद ठाकूर, वैभव पिचड, निरंजन डावखरे हे सदस्य होते त्यांच्या सोबत पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी शिक्षण अधिकारी संगीता भागवत प्रकल्प अधिकारी पवनीत कौर सोबत होते. मोखाडा पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील समस्यांचा आढावा घेत कुपोषणबळी सागर वाघ यांच्या कुटूंबियाची भेट घेऊन व पळसुंडा आश्रमशाळा आणि डोल्हारा पाझर तलावाची पहाणी करून लगेचच जव्हारकडे हा दौरा रवाना झाला यामुळे या धावत्या भेटीतून कल्याण समितीने तालुक्यातील कोणत्या समस्या जाणून घेतल्या असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या मोखाड्याकडे आजवर लोकप्रतिनिधी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता या समितीनेही त्याकडे पाठ फिरविल्याचे या दौऱ्यामुळे स्पष्ट झाले आहे.