पक्षविरोधी कारवाया : पाच जण भाजपतून निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:38 IST2020-01-16T22:38:38+5:302020-01-16T22:38:47+5:30
युवा पदाधिकारी अजय धामोडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्यांना भाजपचे चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे.

पक्षविरोधी कारवाया : पाच जण भाजपतून निलंबित
तलासरी : पक्षविरोधी कारवाया केल्याने भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांनी तलासरी तालुक्यातील पाच भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पक्षातून निलंबित केले आहे.
पक्षविरोधी कारवाया तसेच विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवारांविरुद्ध काम करून त्यांच्या पराभवाला कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवून पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती भानुदास सावल्या भोये, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा पदाधिकारी गीता अजय धामोडे, पंचायत समिती सदस्य, तालुका सरचिटणीस प्रकाश सांबर, भाजप तालुका पदाधिकारी उत्तम रडकू कुरकुटे, युवा पदाधिकारी अजय धामोडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्यांना भाजपचे चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे.